• Download App
    Ajit Pawar परभणीत पवारांना मोठा धक्का; माजी आमदार

    Ajit Pawar : परभणीत पवारांना मोठा धक्का; माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची अजित पवार यांना साथ

    Ajit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    परभणी : Ajit Pawar  राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच, अजित पवार गटाने शरद पवार गटाचे महत्त्वाचे नेते आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांना परभणीत मोठा राजकीय धक्का बसला आहे. परभणीतील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.Ajit Pawar

    दुर्राणी यांनी पाथरीत आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन हा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला. ते येत्या ८ जून रोजी, अजित पवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा प्रवेश शरद पवार यांच्या गटासाठी मोठी धक्का मानला जात आहे.



    दरम्यान, बाबाजानी दुर्राणी यांच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाच्या परभणीतील संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांनी पक्षांतराबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्पष्टपणे सांगितले की, आगामी काळात प्रभावी नेतृत्व आणि विकासाभिमुख राजकारणासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

    याच वेळी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का, यावर चर्चा रंगत आहेत. मात्र, या चर्चांवर खुद्द शरद पवार यांनी “मला माहीत नाही” असे सांगून सडेतोड उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते रोहित पाटील यांनी देखील ही चर्चा फक्त अफवांच्या आधारे असून, वरिष्ठांकडून यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले.

    या घडामोडींमुळे दोन्ही गटांतील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, आगामी काळात अजूनही काही नेते आपली निष्ठा बदलतील का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

    Big blow to Pawar in Parbhani; Former MLA Babajani Durrani supports Ajit Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य