• Download App
    पुण्यात बिग बास्केटच्या गोडाऊनला आग; भाजीपाला, किराणा सामान जळून खाक, सुदैवानं जिवितहानी नाही Big Basket godown fire in Pune;  Destroy vegetables and groceries, fortunately there is no loss of life

    पुण्यात बिग बास्केटच्या गोडाऊनला आग; भाजीपाला, किराणा सामान जळून खाक, सुदैवानं जिवितहानी नाही 

    या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे.मात्र सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाहीत. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.Big Basket godown fire in Pune;  Destroy vegetables and groceries, fortunately there is no loss of life


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यातील कोथरुड परिसरातील बिग बास्केट कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यात गोडाऊनचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.सोमवारी रात्री साडेअकरा वाजता बावधान बुद्रुक येथील बिग बास्केटच्या गोडाऊनला आग लागली.

    याआगीमध्ये धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झालं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामनदलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली आहे.अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे.मात्र सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाहीत. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.



    मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बावधन परिसरातील बिग बास्केट कंपनीच्या गोडाऊनला ही आग लागली आहे. रात्री साडे अकराच्या सुमारास ही आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या जवानांना जवळपास साडे तीन तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र आगीत बिग बास्केट कंपनीचं संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालं आहे.

    बिग बास्केट कंपनीकडून जवळपास पाच किलो मीटर परिसरात अनेक दुकानांमध्ये भाजीपाला, किराणा माल आणि इतर साहित्याचा पुरवठा केला जातो. मात्र आगीत सर्व साहित्य जळून खाकं झालं आहे. त्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान झाल आहे.

    Big Basket godown fire in Pune;  Destroy vegetables and groceries, fortunately there is no loss of life

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai Municipal Corporation, : मुंबई मनपात शिवसेना-भाजपचे 150 जागांवर एकमत; अमित साटम यांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला, उर्वरित 77 जागांचा लवकरच निर्णय

    Nitin Gadkari, : दरवर्षी 5 लाख रस्ते अपघातांमध्ये 1.8 लाख मृत्यू; सरकार 10 मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचवण्याची योजना आणणार

    Chandrashekhar Bawankule : नगर परिषद निवडणुकीत भाजप प्रथम क्रमांकावर राहील; महसूलमंत्री बावनकुळे यांचा विश्वास