महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय राड्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी “राणे, राणा आणि राज” अर्थात हा RRR सिनेमा असल्याचे शरसंधान साधले आहे. Bhujbal says, this is RRR cinema; But that means confession of the superhit triangle
नारायण राणे यांना अटक झाली होती. राणा दाम्पत्य सध्या तुरुंगात आहे आणि राज ठाकरे यांचा नंबर लागणार आहे, असेच त्यांना सूचित करायचे आहे. पण हे सूचित करतानाच त्यांनी तिघांच्या नावामधले R हे कॉमन अक्षर शोधून या तिघांचा RRR सिनेमा असल्याचा टोला लगावला आहे.
पण हा टोला लगावताना भुजबळ एक महत्त्वाची बाब विसरले, की हाच तो RRR सिनेमा आहे, ज्याने भुजबळ आणि महाविकास आघाडीला प्रिय असलेल्या बॉलिवुडचे कमाईची सगळी रेकॉर्ड मोडली आहेत…!! आणि तो दक्षिणेतच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर सुपर डुपर हिट ठरला आहे…!!
त्या सिनेमाशी तुलना करून भुजबळांना “राज, राणा आणि राणे” हा ट्रँगल देखील असाच “सुपरहिट” होईल, असे सुचवायचे आहे का…?? असे सुचवायचे असेल, तर आपलेच नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोचायचे आहे का…??, असे सवाल तयार होत आहेत.
आणि तसाही “राज, राणा आणि राणे” हा RRR सिनेमा असेल आणि तो जर सुपरहिट ठरणार असेल, तर TPP अर्थात “ठाकरे, पवार, पटोले” हा राजकीय सिनेमा जो महाराष्ट्रात सध्या सुरू आहे, त्याचे पोलिटिकल स्टेटस काय असेल…??, या विषयी छगन भुजबळ यांनी विचार केला आहे का…?? की TPP हा सिनेमा फेलच गेलाय याची खात्री त्यांना पटली आहे…?? त्यामुळेच RRR या सिनेमाची “राज, राणे आणि राणा” यांच्याशी तुलना करून भुजबळांनी ठाकरे, पवार आणि पटोले यांना त्यांनी डिवचले आहे…?? या प्रश्नांची उत्तरे नजीकच्या भविष्यकाळात कदाचित मिळतील.
पण ते काहीही असो, भुजबळांनी अनावधानाने किंवा अनवधानाने का होईना “राज, राणे आणि राणा” यांची तुलना RRR सिनेमाशी करून महाराष्ट्रातल्या राजकीय वास्तवाचा आरसाच ठाकरे, पवार आणि पटोले यांना दाखवल्याचे स्पष्ट होत आहे…!!
Bhujbal says, this is RRR cinema; But that means confession of the superhit triangle
महत्वाच्या बातम्या
- नवज्योत सिंग सिध्दू यांचे आता आपवर डोरे, कॉंग्रेसच्या नेत्यांनी केली शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी
- Modi in Germany : दिल्लीहून 1 रुपया पाठवतो, त्यातले 15 पैसेच पोहोचतात, हे आता पंतप्रधानांना म्हणावे लागणार नाही!!