• Download App
    भुजबळांनी सोमय्यांना दिले चॅलेंज ; भरसभेत वाचून दाखवली भाजप सरकारमधील घोटाळ्यांची यादीBhujbal challenges Somaiya; The list of scams in the BJP government was read out in the meeting

    भुजबळांनी सोमय्यांना दिले चॅलेंज ; भरसभेत वाचून दाखवली भाजप सरकारमधील घोटाळ्यांची यादी

    नांदेडमधील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी छगन भुजबळ आज नांदेडमध्ये आले होते. यावेळी झालेल्या प्रचार सभेत छगन भुजबळ यांनी चौफेर तोफ डागली.Bhujbal challenges Somaiya; The list of scams in the BJP government was read out in the meeting


    विशेष प्रतिनिधी

    नांदेड : नांदेडमधील देगलूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. भाजप नेत्यांनी काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांना ईडीच्या कारवाईची धमकी दिली आहे. तर दुसरीकडे ‘किरीट सोमया नांदेडला येण्यापूर्वी भाजपच्या काळात झालेल्या घोटाळ्याचं काय झालं ते सांगा’ असा थेट सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

    नांदेडमधील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी छगन भुजबळ आज नांदेडमध्ये आले होते. यावेळी झालेल्या प्रचार सभेत छगन भुजबळ यांनी चौफेर तोफ डागली.‘किरीट सोमया नांदेडला येणार आहे, पण कशासाठी येताय, अरे मुबंईला बसून आरोप करा. पण त्यापूर्वी भाजपाचं सरकार असताना तुमच्या नेत्यांनी केलेल्या घोटाळ्याचं काय झालं ते बघा, असं म्हणत भाजपा सरकारमध्ये असताना किती घोटाळे झाले याची यादीच भुजबळ यांनी भरसभेत वाचून दाखवली.



     

    भाजप नेत्यांच्या घोटाळ्याबद्दल सोमया का बोलत नाही, असा सवाल त्यांनी केला. अजित पवार यांनी आज भाजप संबंधित साखर कारखान्याची यादी दिली. सोमय्या तिकडे जा की, असा टोलाही भुजबळांनी लगावला.महाविकास आघाडीच सरकार पाडण्यासाठी त्रास दिला जातोय. अजित पवार यांच्या तीन बहिणीच्या घरावर छापे टाकले हे सगळं तोंड बंद करण्यासाठी चाललंय, असंही भुजबळ म्हणाले.

    ‘अडीच वर्षे मला जेलमध्ये ठेवलं कारण मी बोलतो म्हणून, पण आता ही गप्प राहणार नाही. बोलतच जाणार आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास दिला जातो. आज तुमची वेळ आहे. उद्या आमची येईल. ये वक्त है बदल जाता है. आज तेरा वक्त है. कल मेरा आयेंगा. हम ना बदलेंगे. वक्त के रफतार के साथ जब भी मिलेंगे रफतार वही होगी; अशी शायरी करत भुजबळ यांनी भाजपला फटकारले.

    Bhujbal challenges Somaiya; The list of scams in the BJP government was read out in the meeting.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!