विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात 10 % आरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र विधानसभेने एकमताने संमत केल्याच्या पार्श्वभूमीवर हा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा विजय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. परंतु मनोज जरांगे पाटलांनी कुणबी नोंदी आणि सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारने दिलेले मराठा आरक्षण नाकारून आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केली.Bhujbal brought Jarang’s threats and abusive language on the record of the Vidhan Sabha; Serious notice from the Speaker of the Vidhan Sabha!!
मात्र, आजच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांची गेल्या काही दिवसांमधली धमक्यांची आणि शिव्यांची भाषा विधानसभेच्या रेकॉर्डवर आणली. मनोज जरांगे पाटील आत्तापर्यंत फक्त माझ्याच नावाने शिवीगाळ करून धमक्या देत होते. परंतु आता ते थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने आई माई वरून शिव्या देतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही शिव्या देऊन त्यांना धमक्या देतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. मला जीवे मारण्याच्या धमक्या येतात हे सगळा महाराष्ट्र सहन करणार का??, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भुजबळांच्या वक्तव्याची दखल घेऊन राज्य सरकारला उचित कारवाई करण्याचे आदेश दिले. भुजबळांच्या जीविताला धोका आहे, असे त्यांना वाटत असेल तर त्या संदर्भात राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन उचित कारवाई करावी, असे राहुल नार्वेकर यांनी आपल्या आदेशामध्ये नमूद केले.
मनोज जरांगे पाटील आक्रमक बोलतात त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात. मराठी माध्यमे यांच्या बातम्या तशाच पद्धतीने देतात. परंतु, त्या पलीकडे जाऊन जरांगे पाटलांचे आक्रमक बोलणे शिव्यांमध्ये रूपांतरित झाल्याचेही दिसले आहे. आत्तापर्यंत हा मुद्दा दुसऱ्या कोणीही विधानसभेच्या रेकॉर्डवर आणलेला नव्हता.
पण मराठा आरक्षण विधेयक मंजूर करणाऱ्या आजच्या विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने जरांगे पाटलांच्या धमक्या आणि शिव्यांच्या भाषेची नोंद छगन भुजबळांनी विधानसभेच्या रेकॉर्डवर आणली. याला भविष्यातल्या राजकारणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. सरकारला आता विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून जरांगे पाटलांना समज द्यावी लागणार आहे.
Bhujbal brought Jarang’s threats and abusive language on the record of the Vidhan Sabha; Serious notice from the Speaker of the Vidhan Sabha!!
महत्वाच्या बातम्या
- पासपोर्ट क्रमवारीत भारताची 5 स्थानांनी घसरण, या सहा देशांचे पासपोर्ट सर्वात शक्तिशाली
- ब्रिटिश पीएम ऋषी सुनक यांच्याविरुद्ध बंडाची तयारी; 100 खासदार राजीनामा देण्याची शक्यता
- छत्रपती शिवरायांचे आग्रा येथे स्मारक उभारणार केंद्र सरकार, कोठी मीना बाजारात औरंगजेबाने ठेवले होते कैदेत
- निवडणुकीत अजितदादांचा व्हीप शरद पवार गटाला लागू नाही; सुप्रीम कोर्टाचे आदेश, आयोगाने दिलेले नाव वापरणार