• Download App
    मुंबईत डब्बेवाला भवनच्या एक्सपिरिएन्स सेंटरचे भूमिपूजन; डब्बेवाल्यांच्या घरांसाठी नेटाने पाठपुरावा; फडणवीसांची ग्वाही Bhoomipujan of Dabbewala Bhavan Experience Center in Mumbai

    मुंबईत डब्बेवाला भवनच्या एक्सपिरिएन्स सेंटरचे भूमिपूजन; डब्बेवाल्यांच्या घरांसाठी नेटाने पाठपुरावा; फडणवीसांची ग्वाही

    प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई डब्बेवाला भवनाच्या एक्सपिरिएन्स सेंटरचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले. यावेळी आमदार श्रीकांत भारतीय, सपना म्हात्रे आणि डब्बेवाले आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. Bhoomipujan of Dabbewala Bhavan Experience Center in Mumbai

    डब्बेवाल्यांनी आपत्तीच्या काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला स्वतःच्या कष्टाचे पैसे मदत म्हणून दिले. श्रीकांत भारतीय यांनी विधान भवनात डब्बेवाल्यांच्या व्यथा मांडल्याने मला या समस्या समजल्या. डब्बेवाल्यांच्या निवासासाठी आम्ही पाठपुरावा करत असून हा संकल्प आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने पूर्ण करू, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.

    फडणवीस म्हणाले, डब्बेवाले हे मुंबईचे खरे वैभव आहेत. कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय 130 वर्षे परंपरा चालवणे ही मोठी गोष्ट आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यात डबे पोहोचविताना एकही दिवस एकही क्षण एकही चूक होत नाही, असे अचूक आणि बिनचूक काम डब्बेवाले करतात. कंप्यूटर कोडिंग पेक्षा त्यांचे काम अचूक आहे. म्हणून जगभरातील अनेक मॅनेजमेंट संस्थांनी डबेवाल्यांचे काम समजून घेतले. डबेवाल्यांच्या कामाचे जगभरातील नेत्यांना कुतूहल आहे.

    छत्रपती शिवाजी महाराजांनी साद घातली आणि अतिशय सामान्य मावळ्यांनी स्वराज्याचे अस्मानी कार्य पूर्ण केले.
    यामुळे देव, देश आणि धर्माची संकल्पना सर्वांपर्यंत पोहोचली. वारकऱ्यांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतल्यानेच महाराष्ट्र धर्म जिवंत राहिला. त्याच परंपरेचे पाईक 130 वर्षे डबेवाले आहेत. ज्या भक्तीने आपण विठ्ठलाची सेवा करतो त्याच भक्तीने डब्बेवाले ग्राहकाची सेवा करतात. ते जे काम करतात ती एकप्रकारे वारीच आहे.

    एक्सपिरिएन्स सेंटरच्या माध्यमातून हे असामान्य कार्य लोकांपर्यंत पोहोचविता येईल. डब्बेवाले जरी तंत्रज्ञान वापरत नसले तरी तंत्रज्ञान वापरून जागतिक दर्जाचे सेंटर उभारू आणि त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. डब्बेवाल्यांचे कार्य अन्नपूर्णेचे आणि ईश्वरीय कार्य आहे. तसाच ईश्वरी आशीर्वाद तुमचे काम करताना आम्हाला मिळेल आणि डब्बेवाल्यांशी तयार झालेला ऋणानुबंध कायम राहील, असे उद्गार फडणवीसांनी काढले.

    Bhoomipujan of Dabbewala Bhavan Experience Center in Mumbai

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस