हायड्रॉलिक प्रेशर जॅक अचानक तुटल्यानं कोळशानं भरलेला हा कंटेनर वीटभट्टी मजुराच्या झोपडीवर कोसळला.Bhiwandi: Coal container overturned on hut, 3 girls killed
विशेष प्रतिनिधी
भिवंडी : भिवंडी तालुल्यातील टेंभिवली गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.एक कोळशानं भरलेला कंटनेर वीट भट्टी मजुराच्या घरावर पलटी झाल्यानं या घरातील तीन मुलांचा यामध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे.दरम्यान स्थानिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरु केलं.तसेच भिवंडी पोलीस या दुर्घटनेचा तपास करत आहेत.
पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार,
बालाराम वळवी हे आपल्या झोपडीवजा घरात कुटुंबासह झोपेत असताना त्यांच्या घराशेजारी वीटभट्टीसाठी लागणारा कोळशाचा कंटेनर खाली केला जात होता. याला वळवी यांनी अनेकदा विरोध केला होता. परंतू त्यांचा विरोध डावलून असे कंटेनर त्यांच्या घराशेजारील जागेतच उतरवला जात होता. वीटभट्टीवर लागणारा कोळसा कंटेनर रिकामा करत होता.
दरम्यान त्याचा हायड्रॉलिक प्रेशर जॅक अचानक तुटल्यानं कोळशानं भरलेला हा कंटेनर वीटभट्टी मजुराच्या झोपडीवर कोसळला.तसेच या भीषण दुर्घटनेत या घरात राहणारे सर्वजण कोळशाच्या ढिगाऱ्यात गाडले गेले. मात्र, यामध्ये तीन मुलींची दुर्दैवी मृत्यू झाला.
तसेच स्थानिकांनी वळवी व त्यांची पत्नी आणि एका लहान चिमुकल्याला बाहेर काढण्यात यश मिळवलं. संतप्त जमावाने कंटेनरची तोडफोड केली आहे, याप्रकरी सध्या भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर वीटभट्टी मालक, ट्रक मालक यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Bhiwandi: Coal container overturned on hut, 3 girls killed
महत्त्वाच्या बातम्या
- Mumbai : वांद्र्यात चार मजली इमारत कोसळली ,15 जण जखमी ; 6 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल
- राजपथावर महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ चित्ररथाचे शानदार प्रदर्शन
- बीड : पालकमंत्री धनंजय मुंडेंसमोरच एकाने केला आत्मदहन प्रयत्न ; पोलिसांमुळे टळला अनर्थ
- Republic Day : नागपुरात दिव्यांग मुलीने अंबाझरी तलावात केले ध्वजारोहण
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारा तूर्त तरी कोणताच नेता नाही; सध्या मतदान झाले तर मोदीच मोदींना पर्याय