प्रतिनिधी
मुंबई : सरसेनापती संताजी घोरपेड साखर कारखान्यातील मनी लॉड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची चौकशी सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. मात्र हा आरोप राहुल कुल यांनी फेटाळला आहे. Bhima Patas factory was not allowed to be privatized; Rahul Kul rejected Sanjay Raut’s allegations
संजय राऊतांनी पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखाना लि. मध्येही गैरव्यवहार होत असल्याचा दावा करत, या कारखान्यात आमदार राहुल कुल यांनी ५०० कोटींचा मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप केला आहे. यासंबंधित राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक आणि सहकार आयुक्तांना पत्र दिले आहे. मात्र हे सर्व आरोप राहुल कुल यांनी फेटाळून स्पष्टीकरण दिले आहे.
माध्यमांशी बोलताना राहुल कुल म्हणाले की, ‘मी गेल्या २२ वर्षांपासून भीमा सहकारी कारखान्याचा अध्यक्ष आहे. कारखाना अडचणीत असताना मी वैयक्तिकरित्या कारखान्याला आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. पण कधीही कारखाना खासगी होऊ नये याच्यासाठीही प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही आमचा प्रामाणिक प्रयत्न करत असताना राजकारणात अशा प्रकारचे आरोप होणे अपेक्षित आहे. याच्या मागे राजकारण व्यतिरिक्त काहीच दिसत नाही.
अनेक सहकारी साखर कारखाने डबघाईला आणून नंतर त्यांचे राजकीय चतुराईने खासगीकरण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राहुल कुल यांनी आपण भीमा पाटस कारखाना खाजगी होऊ दिला नाही, हे सूचक उद्गार काढून संजय राऊत यांचे आरोप फेटाळले आहेत. त्याला विशेष महत्त्व आहे.
पुढे राहुल कुल म्हणाले की, संजय राऊतांनी केलेले आरोप खरेच असतात असे नाही, मी योग्य ठिकाणी याबाबत माझी बाजू मांडणार आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे आणि राजकीय आकसापोटी, सुडबुद्धीने राऊतांनी हे आरोप केले आहेत.
दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखानाच्या अध्यक्षपदी राहुल कुल आहेत. जे विशेषाधिकार समितीचेही अध्यक्ष आहेत. या समितीने संजय राऊतांना हक्कभंगाची नोटीस बजावली होती.
Bhima Patas factory was not allowed to be privatized; Rahul Kul rejected Sanjay Raut’s allegations
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद! भारताच्या मदतीने तब्बल ४० लाख श्रीलंकन मुलांचे शिक्षणाचे स्वप्न होत आहे पूर्ण
- लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावरील कारवाईमुळे नितीश कुमार सर्वाधिक खूश : सुशील मोदी
- शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडिओ : किती खाली पडाल रे, वरुण सरदेसाईंना टॅग करत नरेश म्हस्केंचे ट्वीट
- मोदी कर्नाटकात, अमित शाह केरळात; राजकीय भूकंप आंध्रात, माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डींचा काँग्रेसचा राजीनामा!!