• Download App
    भीमा कोरेगाव हिंसाचार चौकशी आयोगाचे परमवीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स; 8 नोव्हेंबरला हजर राहावे लागणार|Bhima Koregaon Violence Commission of Inquiry summons Paramvir Singh, Rashmi Shukla; Must be present on November 8th

    भीमा कोरेगाव हिंसाचार चौकशी आयोगाचे परमवीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स; ८ नोव्हेंबरला हजर राहावे लागणार

    वृत्तसंस्था

    मुंबई : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणाची चौकशी आणि तपास करणाऱ्याची आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुकला यांना पाठविण्यात पाठविण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.Bhima Koregaon Violence Commission of Inquiry summons Paramvir Singh, Rashmi Shukla; Must be present on November 8th

    पुण्यामध्ये एल्गार परिषद झाल्यानंतर भीमा कोरेगाव येथे हिंसाचार उसळला होता. त्यामध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर देखील आरोप झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने या संदर्भात चौकशी आयोग नेमला होता. तसेच राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने देखील या हिंसाचाराचा तपास आपल्या ताब्यात घेतला होता.



    त्यावेळी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमवीर सिंह हे होते आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुकला या कायदा व सुव्यवस्था आयुक्त होत्या. त्यामुळे या दोघांना चौकशी आयोगासमोर येत्या ८ नोव्हेंबरला हजर राहण्याचे समन्स पाठविण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

    परमवीर सिंग सध्या बेपत्ता आहेत. त्यांनी १०० कोटींच्या वसुली प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर ते नेमके कोठे आहेत याचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यांच्यावर अनेक प्रकरणांमध्ये चौकशी आणि तपास सुरू आहे. आता भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात देखील त्यांना समन्स बजावण्याचा निर्णय झाला आहे.

    Bhima Koregaon Violence Commission of Inquiry summons Paramvir Singh, Rashmi Shukla; Must be present on November 8th

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा