विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात तब्बल पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या भावना गवळींचे तिकीट यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कापले. त्यांच्या ऐवजी खासदार हेमंत पाटील यांचेही तिकीट कापून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मधून तिकीट दिले. मात्र, त्यामुळे नाराज झालेल्या भावना गवळी गेले काही दिवस “आऊट ऑफ रिच” होत्या. त्या यवतमाळ वाशिम मध्ये प्रचारात देखील उतरल्या नव्हत्या, पण आता भविष्यावर नजर ठेवून भावना गवळींनी आपली नाराजी तलवार म्यान केली आहे. तिकीट कापल्याची आपल्याला खंत आहेच, पण आपण नेतृत्वावर नाराज नाही. शिवसेना पक्षाचा प्रचार करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा आहेच, असा खुलासा भावना गवळी यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी यवतमाळ वाशिमचे जिल्हाप्रमुख उपस्थितीत होते.Bhavana Gawli’s sword of displeasure is sheathed in Yavatmal Washim!!
भावना गवळी म्हणाल्या :
गेल्या 25 वर्षांपासून मी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. माझ्या कार्यकाळात अनेक कामे मी केली. अकोला ते पूर्ण रेल मार्ग मी पुढाकार घेऊन ब्रोड गेज तयार केला. वर्धा – नांदेड रेल्वे मार्ग मी पुढाकार घेऊन काम मी केले. मी नाराज नाही, पण मला या गोष्टीची खंत आहे. मी कुठे कमी पडली हे मला पाहावे लागेल.
माझ्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे. पक्षाचे नेते महत्त्वाचे आहेत. माझ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महत्त्वाचे आहेत. देवेंद्र फडणवीसांनी मतदारसंघाच्या विकासासाठी पाठबळ दिले. मुख्यमंत्री शिंदेंशी अनेक मुद्द्यावर पक्षाच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली आहे. उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मला दिली आहे. त्यांच्यासाठी मी प्रचार करीन. यात काही दुमत नाही.
लोकसभेचे तिकीट कापण्याचा विषय संपला आहे. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहे. लोकं म्हणत असतील सोन्याचा चमच घेऊन आले आहे. पण मी अनेक संघर्ष पाहिला आहे. पक्षाचा निर्णय आहे यामध्ये मला काही वाटत नाही की बोलले पाहिजे.’
पक्षश्रेष्ठींचा निर्णय महत्त्वाचा असतो. जे झालं ते भूतकाळ आहे. आता भविष्याकडे पाहते आहे. मी शिवसेनेसाठी काम करत राहणार. मी प्रसिद्धीच्या भानगडीत कधी पडली नाही. मी कधी सर्व्हे केला नाही. आता मी पक्षासाठी बांधिल आहे. माझी पुढची राजकीय वाटचाल हे मुख्यमंत्री शिंदे ठरवतील. मी नाराज होणाऱ्यांपैकी नाही. संघर्ष करणारी मी आहे. संघर्ष करणारे नाराज होत नाहीत.
आपली पुढची राजकीय वाटचाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील, या भावना गवळींच्या वक्तव्यातून त्यांनी भविष्यावर नजर ठेवून आपली नाराजीची तलवार म्यान केल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपने देखील मध्य प्रदेशात 3 केंद्रीय मंत्री आणि 7 खासदारांना विधानसभा निवडणुकीत तिकिटे देऊन उतरवले होते. त्यातले आता नरेंद्र सिंह तोमर मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष आहेत, तर कैलास विजयवर्गीय आणि प्रल्हाद सिंह पटेल हे मध्य प्रदेशात मंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत देखील अशा स्वरूपाचा प्रयोग होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
Bhavana Gawli’s sword of displeasure is sheathed in Yavatmal Washim!!
महत्वाच्या बातम्या
- ताहाने रचला होता कट, तर शाजिबने पेरला IED, अखेर असे जेरबंद झाले बंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील आरोपी
- पंतप्रधान मोदी म्हणाले- ईडी प्रकरणांपैकी फक्त 3% प्रकरणे राजकीय नेत्यांशी संबंधित
- केंद्रीय माहिती आयोगाची निवडणूक आयोगाला नोटीस; EVM-VVPAT शी संबंधित RTIला प्रतिसाद दिला नाही
- मोदी म्हणाले, संविधान आमच्यासाठी कुराण, बायबल आणि गीता!!; या विधानाचा अर्थ समजतोय का??