विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यासह देशात कोविडने मोठ्या प्रमाणावर थैमान घातलं होत. यावर पर्याय म्हणून लसीकरण माहीम मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. मात्र लसीकरण मोहिमेबाबत प्रथम मोठ्याप्रमाणावर उलट सुलट चर्चा होत्या. त्या चर्चांना मोडीत काढत आणि नागरिकांची भीती दूर करत आहे.Bharti Pawar targets state government, says -Nine crore vaccinations should be appreciated
राज्यात नऊ कोटींचा टप्पा पार होत असल्याचं मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना मांडले. तर, लसींवरून टीका करणाऱ्यांनी आता नऊ कोटींचा टप्पा गाठला म्हणून कौतुक करायला हरकत नाही, असा टोलाही महाविकास आघाडीतील पक्षांना लगावला.
देशातील लसीकरणाचा आकडा शंभर कोटींजवळ पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री भारती पवार यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. लवकरच भारतात एका इतिहासाची नोंद होईल. शंभर कोटी लसीकरणाचा आकडा आपण पार करू. एकेकाळी लस आणायला वर्षानुवर्षे लागायची मात्र यावेळी लवकरच लस उपलब्ध केली गेली.
आजही युद्धपातळीवर लसीकरणाचे काम सुरू आहे. लसीसाठी ३५ हजार कोटींची तरतूदही करण्यात आली होती. नऊ महिन्यात यशस्वीरित्या लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यात आले. जगातील अनेक देश भारताच्या या कामगिरीचे कौतुक करत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळायला हवी याकडे मोदींनी लक्ष दिल्याचे सांगतानाच इतक्या मोठ्या प्रमाणातील लसीकरण टीम वर्कमुळे शक्य झाल्याचेही भारती पवार म्हणाल्या.
आता लहान मुलांच्या लसीकरणाची तयारी सुरू असल्याचे सांगून पवार म्हणाल्या की, आवश्यक परवानग्या, मान्यता मिळताच लहान मुलांचे लसीकरण सुरू होईल. अद्याप दुसऱ्या लाटेचे संकट टळले नाही. शिवाय, तिसरी लाट येऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. केंद्र सरकार तिसऱ्या लाटेवर लक्ष ठेवून असल्याचेही पवार यांनी सांगितले.
Bharti Pawar targets state government, says -Nine crore vaccinations should be appreciated
महत्त्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडे – ओबीसी , मराठा आरक्षणावर महाराष्ट्रात असंतोष आहे
- क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या भवितव्याचा निर्णय आज होणार; १७ दिवसापासून अटकेत
- प. बंगालमधील नामवंतांचे शेख हसीना यांना पत्र , मंदिरांवरील हल्लेखोरांना शासन करा
- उत्तराखंडमध्ये पावसाचे रौद्ररूप, महापुराचा हाहाकार; अनेक गावांचा संपर्क तुटला ; ४७ जणांचे बळी
- कॅप्टन अमरिंदर सिंग करणार नवीन पक्ष स्थापन, कॉंग्रेस विरोधात भाजपसह इतर पक्षांची आघाडी