प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष, अर्थतज्ज्ञ व इतिहास संशोधक डॉ. विवेक देबरॉय यांना यंदाच्या “भांडारकर स्मृती” पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी आज येथे दिली. बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या शुभहस्ते गुरुवार, दिनांक 13 जुलै रोजी सायं. 5 वाजता भांडारकर संस्थेत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रुपये 1 लाख, मानपत्र व भांडारकरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.Bhandarkar Shruti Puraskar.. dr vivek debrai
यावेळी अधिक माहिती देताना संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन म्हणाले की, गेल्या वर्षी मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलुरकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यंदाच्या वर्षी पुरस्कार प्रदान कार्यक्रमात संशोधनात्मक काही पुस्तकांचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे. डॉ. विवेक देबरॉय यांनी महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे भाषांतर केले आहे.
Bhandarkar Shruti Puraskar.. dr vivek debrai
महत्वाच्या बातम्या
- बाई पण भारी या सिनेमाच्या जोरदार यशानंतर सिनेमाच्या गायिकेचे जोरदार सेलिब्रेशन..
- परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी गुजरातमधून दाखल केला राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज
- देशाच्या 73% लोकसंख्येवर कोणतेही कर्ज नाही; 5 लाखांपर्यंत कमावणारे 93 कोटी लोक, उत्पन्नापेक्षा त्यांच्या गरजा जास्त
- पोलिसांबद्दल लोकांना आदर आणि आधार वाटायला हवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे