विशेष प्रतिनिधी
भंडारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विदर्भात हाहाकार माजविला होता. मात्र, विदर्भातीलच एक जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. महाराष्ट्रातील भंडारा हा जिल्हा कोरोनामुक्त जिल्हा झाला आहे. शुक्रवारी शेवटच्या कोरोना रुग्णाला देखील डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शुक्रवारी झालेल्या कोरोना चाचणीत कोणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग आढळला नाही.Bhandara district became corona free, no active patient
जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जिल्ह्याला कोरोनामुक्त करणे शक्य झाले आहे. ट्रेसिंग, चाचण्या आणि उपचाराबाबत रणनीती आखण्यात आली. त्यामुळे हे यश मिळू शकले आहे.
गेल्या वर्षी 27 एप्रिल रोजी जिल्ह्यातील गराडा बुद्रुक गावात कोविडचा पहिला रुग्ण आढळला होता.यावर्षी 12 एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यात एकाच दिवसात सर्वाधिक 1596 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. 18 एप्रिल रोजी जिल्ह्यात सक्रिय प्रकरणांची संख्या सर्वाधिक 12 हजार 847 इतकी होती. 12 जुलै 2020 रोजी पहिल्यांदा कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर कोरोनामुक्त होणाºया रुग्णांची संख्या वाढत गेली. 22 एप्रिल रोजी 1568 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. जिल्ह्यात 19 एप्रिल रोजी रिकव्हरी रेट 62.58 टक्क्यांवर होता, आता हाच आकडा वाढून 98.11 टक्के इतका झाला आहे. 12 एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर 55.73 टक्के होता, आता हा दर शून्य झाला आहे. जिल्ह्यात 1.89 टक्के इतका मृत्यूदर आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 4 लाख 49 हजार 832 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यातील 59 हजार 809 लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग आढळला आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 58 हजार 776 जणांनी कोरोना विषाणूवर यशस्वीपणे मात केली आहे.
जिल्ह्यातील 9.5 लाख एकूण लोकसंख्येपैकी 40 टक्क्यांहून अधिक लोकांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यातील 15 टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत, असे कदम यांनी सांगितले.
Bhandara district became corona free, no active patient
महत्त्वाच्या बातम्या
- गाईंची घेता तशीच लोकांचीही काळजी घेता का? गुजरात उच्च न्यायालयाचा गिर-सोमनाथच्या जिल्हाधिकाऱ्यांना सवाल
- सोशल मीडिया बेलगाम घोड्यासारखे, नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशिक्षण घ्या आणि तयारीला लागा, योगी आदित्यनाथ यांचे आवाहन
- मंत्रीपदाच्या बळावर क्रुरतेचे राजकारण, उद्या आमची सत्ता आल्यावर तुम्हाला ते झेपणार नाही, गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांना धनंजय महाडिक यांचा इशारा
- निरज चोप्रा : महाराष्ट्राचाच वंशज ! सदाशिव भाऊंच्या पराक्रमाचा साक्षिदार…पानीपत गाजवणार्या मराठी वीरांच तेज…!