• Download App
    "बाई पण भारी देवा!" रेकॉर्ड ब्रेक कमाई !|Bhai banbhari Deva budget collection.

    “बाई पण भारी देवा!” रेकॉर्ड ब्रेक कमाई !

    अवघ्या पाच कोटी बजेटमध्ये असणाऱ्या सिनेमाने कमवले 50 कोटी.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मराठी मनोरंजन विश्वात सध्या एकाच सिनेमाचं नाव गाजतंय. आतापर्यंत घातलेले सगळे आयाम आणि नियम मोडीत काढत या सिनेमाने लोकप्रियतेची उच्चांक पातळी गाठली आहे. हिंदी सिनेमा नाही काहीच मागे टाकत या मराठी चित्रपटांना अटकेपार झेंडा रोलाय. Bhai banbhari Deva budget collection.

    अवघ्या पाच कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या सिनेमांना आतापर्यंत 50 कोटींचा गल्ला जमवला आहे. मराठी चित्रपट विश्वाला हे अभूतपूर्व यश मिळताना दिसत आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची मोठी चर्चा सुरु झाली आहे.



    एकीकडे बॉलीवूच्या चित्रपटांकडे वाढणारा प्रेक्षकांचा ओघ, आणि त्यातून हिंदी चित्रपटांची होणारी कमाई टॉलीवूडच्या चित्रपटांच्या दृष्टीनं मोठी असली तरी यासगळ्यात मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. केदार शिंदे यांच्या यापूर्वीच्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. खरं तर कोरोनाच्या काळातच बाई पण भारी देवाचे चित्रिकरण पूर्ण झाले होते. मात्र या चित्रपटाला कोरोनाचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर शिंदे यांनी आता हा चित्रपट प्रदर्शित केला आहे.

    महाराष्ट्र भरातच नाही तर देशभरात आणि एकूणच परदेशात देखील महिला वर्गाचा या सिनेमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय. यावर्षी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्यांमध्ये मराठी सिनेमांमध्ये “बाई पण भारी देवा ” हा सिनेमां पहिल्यां तीन मध्ये असणार आहे. या सिनेमाची तगडी स्टारकास्ट , सिनेमाची स्क्रिप्ट गाणी सगळंच लोकांच्या पसंतीस उतरत आहे. केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागात देखील महिला वर्गाचा या सिनेमाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. या निमित्ताने प्रेक्षक आणि समीक्षकांनी देखील केदार शिंदे यांचं आणि संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे..

    Bhai banbhari Deva budget collection.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार