सर्व कोरोना नियम पाळून यंदाचा दसरा मेळावा होणार असल्याचं आधीच पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते.Bhagwangad Dussehra Melava: MP Pritam Munde’s rally started from Gopinath fort
विशेष प्रतिनिधी
बीड : आज दसरा सण आहे, या सणाचे औचित्य साधुन विविध पक्ष मेळाव्याचे आयोजन करतात.यात सर्वाधिक चर्चा असते ती भगवानगड येथे होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याची. सर्व कोरोना नियम पाळून यंदाचा दसरा मेळावा होणार असल्याचं आधीच पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते.
भगवानभक्ती गडावरील मेळाव्यासाठी खासदार प्रीतम मुंडे यांच्या कार रॅलीला सुरुवात झाली आहे. त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन या रॅलीला सुरुवात केलीय, यावेळी प्रीतम मुंडे म्हणाल्या की दसरा मेळाव्याची परंपरा ही मुंडे साहेबांची परंपरा होती, त्यांनी या मेळाव्याच्या परंपरेला सुरुवात केली आहे.
खासदार प्रीतम मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की , कोरोनामुळे एक वर्ष या मेळाव्याला खंड पडला होता. मात्र आता या एक वर्षाच्या खंडानंतर ही रॅली निघत आहे. यावेळी लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे. मात्र हा उत्साह दाखवताना लोकांनी आपापली काळजी घ्यावी. दरम्यान पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, त्या मेळाव्यातून जसा संकेत देतील तसा आमचा संकल्प असेल.
त्यामुळे आता या दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे काय संकेत देणार ? आणि या संकेताला अनुसरून प्रीतम मुंडे काय संकल्प करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bhagwangad Dussehra Melava: MP Pritam Munde’s rally started from Gopinath fort
महत्त्वाच्या बातम्या
- देशात लोकसंख्येचे असंतुलन परवडणारे नाही, राष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण धोरण सर्वांसाठी समानच हवे; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
- संरक्षण क्षेत्रात विजया दशमीचे सीमोल्लंघन; ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या कॉर्पोरेटायझेशनमधून 7 नव्या कंपन्या स्थापन; 65 हजार कोटींच्या ऑर्डर्स
- ब्रिटनसह जगभरातील ३० राष्ट्रांकडून भारताच्या कोरोनाविरोधी लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता
- केरळात कोरोना मृतांच्या कुटुंबांना दरमहा ५००० रुपयांची मदत देण्याचा निर्णय