प्रतिनिधी
देहरादून : महाराष्ट्रात वादग्रस्त ठरविण्यात आलेले राज्यपाल भगतसिंह कोशियारी राजभवनातून आपले गृहराज्य उत्तराखंडाची राजधानी देहरादूनला गेले काय, तेथून त्यांनी एकापाठोपाठ एक मुलाखती देत फुल्ल राजकीय बॅटिंग केली आहे. Bhagat Singh koshiyari targets Uddhav Thackeray over his chief ministership
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी फिट नाहीत. ते संत माणूस आहेत पण त्यांना कोणीतरी मुख्यमंत्री पदावर चढवले म्हणून ते बसले, अशा शब्दांमध्ये भगतसिंह कोशियारी यांनी उद्धव ठाकरे यांचे वाभाडे काढले आहेत. कोशियारी यांनी महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल झालेल्या सर्व वादाची कसर मुलाखतींमधून भरून काढली आहे. पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना एका चढ एक शॉट हाणले आहेत.
भगतसिंह कोशियारी हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यामुळे वक्र भाषाशैली बाबत त्यांचा कोणी हात धरू शकणार नाही. त्यामुळे ठाकरे – पवारांना जोरदार चिमटे काढत त्यांनी गेल्या अडीच वर्षातली सगळी कसर भरून काढली. उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीचे माणूस आहे. ते राजकारणासाठी फिट नाहीत. हिंदीत एक कहावत आहे, चढ़ जा बेटा सुली पे भली करेंगे राम!! अशा पद्धतीने त्यांना मुख्यमंत्रीपदावर कोणीतरी चढवले. शेवटी त्यांचा बळी गेला. त्यांनी मला विमानातून उतरवले, पण प्रभूची लीला अशी आहे की त्यांना गादीवरनं उतरावे लागले, अशा शब्दांमध्ये भगतसिंह कोशियारी यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचे वाभाडे काढले. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री होण्यापेक्षा स्वतःची संघटना टिकवून चालवायला हवी होती, असा सल्लाही त्यांनी दिला. भविष्यकाळात आदित्य ठाकरे पुढची राजकीय वाटचाल नीट करोत, अशा शुभेच्छा दिल्या.
त्याआधी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत कोशियारी यांनी शरद पवारांचे वाभाडे काढले. सकाळी आठ वाजता झालेल्या शपथविधीची माहिती शरद पवारांना होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्या संदर्भात पवारांनी कानावर हात ठेवले होते. पण भगतसिंग कोशियारी यांनी शरद पवार स्वतःचे राजकारण साधून घेण्यासाठी तसे बोलले. त्यांच्या लवासा प्रकरणाची केस हायकोर्टात चालू आहे. हायकोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत त्याबद्दल त्यांनी दहा वेळा विचार करून बोलावे, असा टोमणा कोशियारी यांनी पवारांना लगावला. कोशियारी यांच्या या मुलाखती सोशल मीडिया आणि मीडियावर जोरदार गाजत आहेत.
Bhagat Singh koshiyari targets Uddhav Thackeray over his chief ministership
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांवर अश्लील टीका केल्याबद्दल संजय राऊतांवर नाशिक मध्ये गुन्हा; तरीही सामनातून कमळाबाई म्हणून टीका!!
- केंद्रीय कर्मचार्यांना आनंदाची बातमी : महागाई भत्त्यात 4% वाढीची शक्यता, 1 मार्च रोजी घोषणेची अपेक्षा
- सरसंघचालक म्हणाले- प्रत्येक भारतीयाचा पूर्वज हिंदू : मोहन भागवत यांचे बरेलीत प्रतिपादन- जातिभेद सोडा