• Download App
    कोशियारींच्या मुलाखतीतले कळीचे सवाल; उद्धव ठाकरेंचे शकुनी मामा कोण??,आणि....|Bhagat Singh koshiyari posed sharp questions that put MVA leaders in the dock

    कोशियारींच्या मुलाखतीतले कळीचे सवाल; उद्धव ठाकरेंचे शकुनी मामा कोण??,आणि….

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार होऊन देहरादूनला परत गेल्यानंतर भगतसिंह कोशियारी यांनी मुलाखतींमधून जे राजकीय फटाके फोडले आहेत, त्याचे आवाज महाराष्ट्रात दुमदुमले आहेत.Bhagat Singh koshiyari posed sharp questions that put MVA leaders in the dock

    महाविकास आघाडी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर भगतसिंह कोशियारी यांनी मुलाखत देऊन फुल्ल राजकीय बॅटिंग केली आहे.



    मात्र त्यापलिकडचे दोन सवाल कोशियारी यांच्या मुलाखतीतून समोर आले आहेत, त्याकडे माध्यमांचे दुर्लक्ष झाले आहे किंवा माध्यमांनी बातम्या देताना दुर्लक्ष केले आहे. हे कळीचे सवाल म्हणजे उद्धव ठाकरे यांचे शकुनी मामा कोण?? आणि राजभवनात जाऊन कोणकोणते आमदार कोशियारी यांना आपल्याला वाचवायला सांगत होते??, हे होत!!

    कोशियारी यांनी मुलाखतीमध्ये हे दोन्हीही ठळक उल्लेख केले आहेत. उद्धव ठाकरे शकुनी मामाच्या जाळ्यात अडकले होते. आता मला काय माहिती त्यांचे शकुनी मामा कोण??, असा सवाल करून कोशियारी यांनी त्यांचेच आमदार राजभवनवर येऊन आम्हाला वाचवा, असे म्हणायचे असा खुलासाही केला आहे. त्यामुळे जसा उद्धव ठाकरे यांचे शकुनी मामा कोण??, हा कळीचा सवाल आहे, तसाच कोणकोणते आमदार कोशियारी यांच्याकडे जाऊन आपल्याला वाचविण्यासाठी त्यांना सांगत होते??, हाही तितकाच कळीचा सवाल आहे.

    या दोन सवालांच्या वास्तववादी उत्तरांमध्ये महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांमधील परस्पर संबंध, त्याचबरोबर ठाकरे – पवार संबंध, ठाकरे – राऊत संबंध आणि पवार – राऊत संबंध या सर्वांची राजकीय गुंतागुंत लपली आहे. या सवालांची उत्तरे महाविकास आघाडीतले कोणी नेते देणार का??, हाही तितकाच कळीचा सवाल आहे!!

    Bhagat Singh koshiyari posed sharp questions that put MVA leaders in the dock

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस