प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्ह्याच्या लोकसभा खासदारकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यात राजकीय जुगलबंदी जुंपली आहे. भाजपने उदयनराजेंना कोणतीही जबाबदारी दिली तरी राष्ट्रवादीला फरक पडणार नाही. श्रीनिवास पाटलांच्या उमेदवारीमुळे सातारा लोकसभेत कोणाला फरक पडला होता?, हे तुम्हाला माहिती आहे, अशी टोलेबाजी शरद पवारांनी नुकतीच केली होती. त्यावर उदयनराजेंनी विश्वासघात आणि माघार हे आमच्या घराण्याची परंपरा नाही असे प्रत्युत्तर देत पवारांना प्रतिटोला दिला आहे. Betrayal and withdrawal are not our family tradition
रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी शरद पवारांना उदयनराजे संदर्भात प्रश्न विचारला होता. उदयनराजे यांना भाजप मोठी जबाबदारी सोपवणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला सातारा जिल्ह्यात काय फरक पडेल?, असे विचारल्यावर पवार म्हणाले होते, की राष्ट्रवादीला त्यांच्या जबाबदारीतून काही फरक पडणार नाही. उलट श्रीनिवास पाटलांची लोकसभेला उमेदवारी होती, तेव्हा साताऱ्यात काय फरक पडला हे तुम्हाला माहिती आहे.
यासंदर्भात उदयनराजेंना आज पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी शरद पवारांचा निवृत्ती नाट्याचा विषय काढला. शरद पवारांनी निवृत्ती घोषित करून नंतर राजीनामा मागे घेतला. या संदर्भात टोला हाणताना उदयनराजे म्हणाले, ते मोठे नेते आहेत. त्यांचे वाचन मोठे आहे. पण साताऱ्या बाबतचे ते बोलले ते खरे आहे. मी राजीनामा दिला. पण माघार घेतली नाही आणि विश्वासघात करणे ही आमच्या घराण्याची परंपरा नाही. उदयनराजेंनी हाणलेल्या या टोल्यावर राष्ट्रवादीची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.
Betrayal and withdrawal are not our family tradition
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा आज शक्य, काँग्रेस निरीक्षकांनी खरगे यांना अहवाल सादर केला; डीके शिवकुमार आज दिल्लीला जाणार
- आमच्या सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड मोडले, राजस्थानच्या काँग्रेस मंत्र्यांचा मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर खळबळजनक आरोप
- पाकिस्तानच्या कोळसा खाणीत हद्दवाढीवरून वाद विकोपाला, रक्तरंजित संघर्षात तब्बल 16 जणांचा मृत्यू
- प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला सल्ला, जास्त खुश होऊ नका, 2013 मध्ये विजयी होऊनही 2014 मध्ये पराभूत झाला होता