• Download App
    सांगलीमध्ये व्यापाऱ्यांचे भीक माँगो आंदोलन; पाच दिवसांच्या कोरोना निर्बंधांची तीव्र निषेध Begging movement of traders in Sangli; Strong protest against five-day corona restrictions

    सांगलीमध्ये व्यापाऱ्यांचे भीक माँगो आंदोलन; पाच दिवसांच्या कोरोना निर्बंधांची तीव्र निषेध

    वृत्तसंस्था

    सांगली : कोरोनाच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून पाच दिवस १९ तारखेपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. याला विरोध करत आज व्यापाऱ्यांनी हरभट रोडवरच्या बाजारपेठेत भीक माँगो आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. ता माध्यमातून त्यांनी आपल्या व्यथा शासन दरबारी पोहचवण्याचा प्रयत्न केला. Begging movement of traders in Sangli; Strong protest against five-day corona restrictions

    सांगली जिल्ह्यात कोरोना पोजिटिव्ह रेट वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा लॉकडाउन घोषित केला आहे. आजपासून त्याची सुरवात झाली आहे.. मात्र याला सांगलीच्या व्यापाऱ्यांनी विरोध केला.आज व्यापाऱ्यांनी भीक माँगो आंदोलन केले. यावेळी हातात बोर्ड घेऊन भीक मागितली..

    प्रशासनाने आमच्या या मागण्या मान्य कराव्यात, अशा आशयाचे बोर्ड व्यापाऱ्यांनी हातात धरले होते.  कर्मचारी पगार , व्याज ,  पाणीपट्टी,   GST,  दुकान भाडे  कर्जाचे हफ्ते ,  घरपट्टी , वीजबिल, आयकर,  घरखर्च या न्याय्य हक्कांच्या मागण्यांची सरकारने आम्हाला भीक द्यावी, असे म्हणत हे आंदोलन करण्यात आले.

    सांगली बाजारपेठ गेल्या तीन महिन्यापासून संकटात आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नेमलेली टास्क फोर्स सरकारने प्रथम बरखास्त करावी. कारण ही टास्क फोर्स चार भिंतीत बसून निर्णय घेते. त्यामुळे कधी लॉक तर कधी अन लॉक असे होते. त्यापेक्षा या टास्क फोर्स मध्ये स्थानिकांचा समावेश करावा.
    – समीर शाह, व्यापारी, कोल्हापूर

    Begging movement of traders in Sangli; Strong protest against five-day corona restrictions

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस