• Download App
    मातोश्रीतून एकनाथ शिंदेंआधी माझ्याही हत्येची सुपारी; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप Before Eknath Shinde from Matoshree, I was also killed

    मातोश्रीतून एकनाथ शिंदेंआधी माझ्याही हत्येची सुपारी; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना नगरसेवकांच्या हत्येच्या सुपाऱ्या कोणी दिल्या?, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. एकनाथ शिंदेंना मारण्याची सुपारी नक्षलवाद्यांना दिली होती. मात्र, ही पहिली वेळ नव्हती. ठाण्यातील काही नगरसेवक आणि अगदी मलाही मारण्याची सुपारी मातोश्रीतून 2005 मध्ये दिली होती. मात्र त्यावेळी मला समोरच्यांनी सांगितले तुमची सुपारी दिली आहे जपून रहा. आम्ही नाहीतर बाकी कुणीतरी हे काम करेल, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. Before Eknath Shinde from Matoshree, I was also killed

    माझ्यासाठी मातोश्री नवे नाही, उद्धव ठाकरे इतरांना मर्द असले तर हे करा ते करा असे म्हणतात, त्यांनी तरी ते सिद्ध केले का असा सवाल नारायण राणेंनी केला आहे. तर रमेश मोरे जयेश जाधव यांची सुपारी कुणी दिली असा सवाल राणेंनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. सगळी कामे लोकांकडून करून घ्यायची हे उद्धव ठाकरेंचे काम आहे, असा आरोप नारायण राणेंनी केला आहे.

    उद्धव ठाकरेंची सामनातून आज प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीवर नारायण राणे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरेंची भाषा मर्दानी नाही आणि हे लोकांना मर्द नाही असे म्हणता असा टोलाही राणेंनी लगावला आहे. ते शिवसेनेच्या 40 आमदारांना मर्द नाहीत, असे म्हणतात. पण हे 40 आमदार कर्तृत्ववान आहेत. त्यांनी हिंमत करून शिवसेना सोडली आहे. खरं म्हणजे त्यांनी शिवसेना सोडलेली नाही. ते आमदार म्हणजेच शिवसेना आहेत, असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

    Before Eknath Shinde from Matoshree, I was also killed

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस