• Download App
    ८० टक्के मांसाहारी लोक असलेल्या या देशात बीफबंदी हा ट्रेलर होता - जितेंद्र आव्हाड|Beef ban was a trailer in this country with 80% non-vegetarians - Jitendra Awhad

    ८० टक्के मांसाहारी लोक असलेल्या या देशात बीफबंदी हा ट्रेलर होता – जितेंद्र आव्हाड

    गुजरातमधील अहमदाबादमध्ये महानगरपालिकेकडून रस्त्यांवर मांसाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.Beef ban was a trailer in this country with 80% non-vegetarians – Jitendra Awhad


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काही वर्षांपूर्वी मुंबईत काही सोसायट्यांमध्ये मांसाहारी जेवणावर आणि मांसाहार करणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्यावरून बरंच राजकारण तापल्याच्या चर्चा आजही अधून-मधून होत असतात. दरम्यान आता पुन्हा एकदा व्हेज-नॉनव्हेज हा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. या वादाच्या केंद्रस्थानी आता भाजपा सरकार असणार आहे.

    गुजरातमधील अहमदाबादमध्ये महानगरपालिकेकडून रस्त्यांवर मांसाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये शाळा,महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांपासून १०० मीटर अंतरामध्ये मांसाहारी पदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलवर गुजरात सरकारने कारवाई करण्यात आली आहे. तसेच, मांसाहार पदार्थ विणा-यांना स्टॉल विक्रेत्यांना मनाई करण्यात आली आहे. यामुळे स्टॉल मालकांच्या अडचणीत वाढ झाली.



    याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत गुजरात सरकारवर टीका केली आहे.आव्हाड म्हणाले की ‘अहमदाबादमध्ये रस्त्यावर मांसाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

    दरम्यान ८० टक्के मांसाहारी लोक असलेल्या या देशात बीफबंदी हा ट्रेलर होता. पुढे काय घडणार याचा इशारा देणारा चित्रपट गुजरातमध्ये सुरू झाला आहे. तुम्ही काय खावे, हेसुद्धा आता शासन ठरवणार’, असं आव्हाड म्हणालं.

    Beef ban was a trailer in this country with 80% non-vegetarians – Jitendra Awhad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?