मेटे यांनी आवाहन केले आहे की , त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी.
विशेष प्रतिनिधी
बीड : कोरोना महामारीने जगात सगळीकडे हाहाकार माजविला होता. दरम्यान हळू हळू कोरोनाचा संसर्ग कमी होताना पाहायला मिळाला.तेवढ्यातच आता राज्यासह देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका निर्माण झाला आहे. या नव्या व्हेरियंटचे ओमिक्रॉन असे नाव असून देशातील कर्नाटकात २ ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहे.Beed: MLA Vinayakrao Mete infected with corona; Information posted on Facebook
दरम्यान बीड जिल्ह्यातील शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायकराव मेटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मेटेंनी स्वतःहून फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.तसेच मेटे यांनी आवाहन केले आहे की , त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी.
फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणाले मेटे
मेटें फेसबुक पोस्ट करत म्हणाले की , ‘कोरोना कालावधीमध्ये मागील दोन वर्षांपासून आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मी कोरोनाच्या संसर्गापासून दूर होतो. परंतु शुक्रवारी सकाळी माझी RTPCR टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.
पुढे ते म्हणाले की, मी कोरोना पॉझिटिव झाल्याने मागील दोन-तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व आपली तसेच आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.तसेच माझी तब्येत चांगली आहे.काळजीची बाब नाही. आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असल्याने यातूनही लवकरच बाहेर पडेन.’
Beed: MLA Vinayakrao Mete infected with corona; Information posted on Facebook
महत्त्वाच्या बातम्या
- मेंदूचा शोध व बोध : मेदूच्या रचनेमध्ये ब्रोका केंद्राला अनन्यसाधारण महत्व
- अ.भा. साहित्य संमेलनाला शुभेच्छा, पण सावरकरांच्या नावाला विरोध असेल तर तिथे जाऊन तरी काय करायचे? फडणवीसांनी मांडली भूमिका
- कुसुमाग्रजांचे नाव दिले, पण सावरकरांचे नाव न देण्याचा देण्याचा अट्टाहासातून दोन्ही महनीयांची उंची कमी करत नाही का? फडणवीसांचा परखड सवाल
- भारतीय नौदलाच्या अनेक मोठ्या युद्धनौकांवर आता महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती