Tuesday, 6 May 2025
  • Download App
    भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाचा दणका, तत्काळ बदली करण्याचे आदेश|Beed District Collector slapped by court for backing corruption, orders immediate transfer

    भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाचा दणका, तत्काळ बदली करण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी करण्यात टाळाटाळ करणाºया बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस देण्याबरोबरबरच जिल्ह्याबाहेर बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.Beed District Collector slapped by court for backing corruption, orders immediate transfer

    बीड जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या काळात २०११ ते २०१९ दरम्यान केंद्र शासनाकडून मनरेगा आणि रोहयो योजनेकरिता मिळालेल्या ७.५ कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. रवींद्र घुगे यांनी आदेश दिले होते.



    मात्र, न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता जिल्हाधिकारी जगताप यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रवींद्र जगताप यांची तत्काळ जिल्ह्याबाहेर बदली करा आणि त्यांना उच्च न्यायालयाच्या अवमानाची नोटीस जारी करा,

    असे सक्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. एस.जी. मेहरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.कथित भ्रष्टाचाराचा निष्पक्ष तपास व्हावा यासाठी प्रक्रियेचा अवलंब करून जगताप यांच्या जागेवर नवीन जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करा, असेही आदेशात म्हटले आहे.

    Beed District Collector slapped by court for backing corruption, orders immediate transfer

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस