विशेष प्रतिनिधी
अमरावती : सलग आठ दिवस कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी ४८ कामगारांना कामावरून काढून टाकले होते. परंतु, अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे या कामगारांचा रोजगार वाचला आहे. Because of Yashomati Thakur 48 Workers jobs were saved in Amravati
अमरावती लगतच्या नांदगाव पेठ MIDCमध्ये काँग्रेसच्या कामगार सेलचे अध्यक्ष पंकज शेंडे यांच्या नेतृत्वाखाली काही कामगारांचे आंदोलन सुरू होते. पालकमंत्री यशोमती ठाकूर या आंदोलनाच्या ठिकाणी पोचल्या. सुदर्शन जिन्स कंपनीने ४८ स्थानिक कामगारांना कामावरुन काढून टाकल्याने हे आंदोलन सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या आंदोलनाची तातडीने दखल घेत मंयशोमती ठाकूर यांनी कंपनी प्रशासनाला आंदोलन ठिकाणी बोलावले. तसेच ८ दिवस कामावर आले नाही म्हणून ४८ कामगारांना कामावरुन काढता येणार नाही, असे बजावले. तसेच या कामगारांना कामावर परत घेण्याची सूचना केल्या. कंपनीने कामगार कायद्याचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले. कामगारांनाही अशाप्रकारे सुटी घेणे चुकीचे असल्याचे सांगत यशोमती ठाकुर यांनी वादावर आंदोलनाच्या ठिकाणीच तोडगा काढला.
- यशोमती ठाकूर यांच्यामुळे ४८ जणांना पुन्हा रोजगार
- आठ दिवस गैरहजर राहिल्याने कामगारांना काढले
- नांदगाव पेठ MIDC तील एका कंपनीतील प्रकार
- काँग्रेसच्या कामगार सेलचेही कामगारांसाठी आंदोलन
- आंदोलनस्थळी पोचून ठाकूर यांनी घेतली माहिती
- कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा
- कामावर गैरहजर राहू नका, कामगारांना सूचना
Because of Yashomati Thakur 48 Workers jobs were saved in Amravati
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानात एकाच वेळी 60 हिंदूंचे धर्मांतरण, बळजबरी केल्याचा संशय
- चीनचे बाहुले बनलेल्या नेपाळच्या के. पी. शर्मां ओलींना न्यायालयाचा दणका, शेरबहादूर देऊबा यांना पुढील पंतप्रधान बनविण्याचे आदेश
- खासदार संजय विखे-पाटील म्हणाले, पेट्रोल, डिझेल महागले तर काय झाले, मोफत सुविधा आणि लस मिळत आहे
- भारताला नार्को टेररचा धोका, अंमली पदार्थांविरोधात लढण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन