दरम्यान राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनात काल 12 खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे.Became the voice of the people of the country, will not apologize when democracy is being violated: Priyanka Chaturvedi
विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला काल सुरूवात झाली.कृषी विधेयक रद्द करण्याचं विधेयक पारीत करताना विरोधकांना बोलण्याची संधी न दिल्याचा आरोप करत मोठा गदारोळ केला.
दरम्यान राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनात काल 12 खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यात काँग्रेस, सीपीएम, सीपीआय, तृणमूलसह शिवसेनेच्या खासदारांचा समावेश आहे. यामध्ये शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी आज या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.यावेळी प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की,सर्व खासदारांवर झालेली कारवाई ही बेकायदेशीर असून, त्याबद्दल माफी मागण्याचे काही कारण नसल्याचं प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितलं.पुढे त्यांनी असा सवाल केला आहे की , देशाच्या जनतेचा आवाज बनलो, लोकशाहीचं हनन होत असताना त्याच्याविरोधात आवाज उठवला तर यासाठी माफी मागायची का?
Became the voice of the people of the country, will not apologize when democracy is being violated: Priyanka Chaturvedi
महत्त्वाच्या बातम्या
- ममतांचे मिशन मुंबई सुरवातीलाच अर्ध्यावर!!; तब्येतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटू शकणार नाहीत
- महाबळेश्वरला तब्बल १६ वर्षानंतर बहरली ‘सुपुष्पा’ वनस्पती ; अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न
- सौदी अरेबियाचे पाकिस्तानला 4.2 अब्ज डॉलर्सचे बडे कर्ज, पण विचित्र अटींवर!!
- दिल्ली : केजरीवाल यांनी केली कोविड योद्ध्याच्या कुटुंबाला ₹ १ कोटींची मदत , आत्तापर्यंत १८ कोरोना योध्यांना केली मदत