विशेष प्रतिनिधी
पुणे : आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या अन्यथा पुन्हा निर्बंध लावू असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की केरळ राज्यात निर्बंध कमी केल्याने लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. ओणम सण मोठ्या प्रमाणात साजरा केला. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली असल्याने पुन्हा निर्बंध लावावे लागले आहेत.Be careful during festivals, otherwise we will impose restrictions again, warns Ajit Pawar
महाराष्ट्रात गोपाळकाला, त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी असे मोठे सण ओळीने येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सण साजरे करताना काळजी घ्यावी. अन्यथा पुन्हा निर्बंध लावावे लागतील, असा इशारा पवार यांनी दिला.
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या जनआशिर्वाद यात्रेवर टीका करताना पवार म्हणाले, नारायण राणे यांच्याबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. आम्हाला सरकार चालवायचे आहे. ते केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी त्याचं काम करावं. एकीकडे केंद्र सरकार सांगतेय कोरोना महामारीची काळजी घ्या, गर्दी टाळा तर दुसरीकडे आपल्याच नवीन चार मंत्र्यांना ते सांगतात यात्रा काढा. त्यामुळे कोरोना वाढल्यास त्याला कोण जबाबदार आहे. याचा विचार केंद्र सरकारने करायला हवा.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय गुन्हे अन्वेशनकडून (सीबीआई) क्लीन चीट मिळाल्याचे वृत्त असल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, त्याबाबत मी वाचले आहे. अनेक चौकश्या होत असतात. त्या-त्या वेळी सगळेजण चौकशीसाठी सहकार्य करत असतात. मात्र, देशमुख यांच्याबाबत जोपर्यंत मला अहवाल मिळत नाही. तोपर्यंत मी यावर काहीही बोलणार नाही. उपमुख्यमंत्री या नात्याने बोलणे योग्य नाही असे अजित पवार यांनी सांगितले.
Be careful during festivals, otherwise we will impose restrictions again, warns Ajit Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘फिट इंडिया ॲप’ केले लाँच , तुम्ही तुमच्या फिटनेस ॲक्टिव्हिटीचा मागोवा घेऊ शकता
- जिल्ह्यात पुणे, पिंपरी – चिंचवड शिवाय आणखी दोन महापालिका, हडपसर, चाकणमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या अजित पवार यांच्या सूचना
- आता देशात बीएच (BH) सीरिजची धावणार वाहने ; नंबर प्लेटवर MH ऐवजी ‘BH’ दिसणार, नव्या पॉलिसीचा ‘या’ वाहनधारकांना फायदा
- लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी परदेशातून महाराष्ट्रात प्रवेशासाठी आरटीपीसीआर बंधनकारक