वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात बुधवारी सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. 59 हजार 907 रुग्णांची वाढ झाली आहे. Be careful! Corona patients are on the rise in the state; A record 59907 people were infected on Wednesday
नवीन 30 हजार 296 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 26 लाख 13 हजार 627 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात 322 रुग्णांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत एकूण 56 हजार 652 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 5 लाख 01 हजार 559 अॅक्टिव्ह रुग्ण असून बरे होण्याचे प्रमाण 82.36 टक्के झाले आहे.
राज्यात मंगळवारी 55 हजार 469 रुग्णांची वाढ झाली होती. सोमवारी 47 हजार 288 लोकांना कोरोनाची लागण झाली. रविवारी राज्यात 57,074 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.