• Download App
    Baramati Bypoll: Bawankule Urges Congress for Unopposed Election of Sunetra Pawar बारामतीत काँग्रेसने आपले मोठे मन दाखवावे:सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

    Bawankule : बारामतीत काँग्रेसने आपले मोठे मन दाखवावे:सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

    Bawankule

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Bawankule अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार या उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी जाहिर केले आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना उमेदवार न देण्याची विनंती केली आहे.Bawankule

    या संदर्भात माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांना अजित दादा यांचा दीर्घ काळ सहवास लाभला आहे. काँग्रेस असो की, कोणत्याही पक्षाचा माणूस त्यांच्याकडे गेला तरी अजित पवार त्याचं काम करत होते. त्या अजित पवारांचीच ही सीट आहे. काँग्रेस सोबत अजित पवार यांचा अनेक वर्षांचा सहवास राहिला आहे. आयुष्यातील 75 टक्के राजकारण अजित पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या सहवासात घालवले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना माझी मागणी आहे की, त्यांनी ही सीट बिनविरोध करावे. राहुरी मध्ये त्यांची लढण्याची इच्छा असेल, तर त्यांनी लढावे. त्यांचा तो अधिकार आहे. त्या ठिकाणी आम्हीही लढायला तयार आहोत. मात्र, बारामती मध्ये आमच्या वहिनी सुनेत्रा पवार यांची निवडणूक आहे. ती सर्वांनीच बिनविरोध करावी, अशी आमची मागणी असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.Bawankule



    राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांचा देखील काँग्रेसला बारामतीमध्ये पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांना देखील आम्ही हीच विनंती करत आहे. अजित पवार यांचा या सर्वांनाही सहवास राहिला आहे. अजित पवारांची आठवण अजूनही आपल्या सोबत आहेत. त्यांना जाऊन अजून वर्ष देखील झाले नाही. त्यामुळे किमान या निवडणुकीच्या माध्यमातून तरी काँग्रेसने आपले मोठे मन दाखवावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे.

    राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाच्या विलिनीकरण संदर्भातला निर्णय हा सुनेत्रा पवार यांचाच असेल. त्या त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्यामुळे विलिनीकरण संदर्भातला त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल. त्यामुळे या संदर्भात काही बोलण्यास बावनकुळे यांनी नकार दिला आहे.

    अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचं तात्काळ सर्वेक्षण

    राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचं तात्काळ सर्वेक्षण केलं जाईल आणि अहवालानंतर नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसामुळं गेल्या काही दिवसात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे त्याच्या तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं

    Baramati Bypoll: Bawankule Urges Congress for Unopposed Election of Sunetra Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बारामतीसाठी सुनेत्रा पवारांची फोनाफोनी; सगळी धडपड पवारांची मक्तेदारी टिकवण्यासाठी!!

    Raut : संजय राऊत शिवसेना ठाकरे गट फोडण्याच्या तयारीत; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा; राऊत मिठाचा खडा टाकण्याच्या प्रयत्नात- चंद्रकांत पाटील

    तमिळ अस्मितेच्या राजकारणात अवघ्या 12 % वर वाताहत झालेल्या राष्ट्रीय पक्षांना आपल्या नेत्यांनाही सांभाळता येईना!!; एका खासदाराचा राजीनामा, दुसऱ्याचे तिकीट कापले!!