विशेष प्रतिनिधी
पुणे : बारामतीतल्या टेक्सटाईल पार्क मधल्या “प्रतिभाताई एन्ट्रीत” मालवाहतुकीचे गेट ते परप्रांतीय सुरक्षा रक्षक असा वेगळाच ट्विस्ट आला!! Baramati textile park
आज दिवसभर प्रतिभाताई पवारांच्या बारामती टेक्स्टाईल पार्कच्या एन्ट्रीच्या बातम्या माध्यमांमध्ये चालल्या. त्यांना बारामती टेक्स्टाईल पार्क मध्ये एन्ट्री करण्यापासून कसे रोखले, त्यावेळी प्रतिभाताईंबरोबर त्यांची नात आणि सुप्रिया सुळेंची कन्या रेवती हिला 25 मिनिटे गेट बाहेर कसे थांबावे लागले, वगैरे तपशील चविष्टपणे चर्चिले गेले. प्रतिभाताईंनी या सगळ्या एपिसोडचा व्हिडिओ काढला.Baramati textile park
शरद पवारांच्या पत्नीला बारामतीतल्या टेक्स्टाईल पार्क मध्ये अडवतात म्हणजे काय??, ही हिंमत होतेच कुणाची आणि कशी??, वगैरे सवाल जवाब सोशल मीडियावर झडले. बातमी पवारांची म्हणून मराठी माध्यमांनी ती जोरदार लावून धरली. ते सत्ताधारी आहेत म्हणून ते कसेही वागू शकतात, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.Baramati textile park
पण सायंकाळ होता होता, त्या बातमीत वेगळाच ट्विस्ट आला. बारामती टेक्स्टाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ समोर आले आणि त्यांनी प्रतिभाताईंच्या एन्ट्रीला वेगळाच ट्विस्ट दिला. प्रतिभाताई पवार आणि रेवती सुळे ज्या गेटमधून टेक्सटाईल पार्क मध्ये एन्ट्री करू पाहत होत्या, ते गेट मालवाहतुकीचे गेट आहे. त्यामुळे तिथे फक्त मालवाहतुकीलाच परवानगी देण्यात येते. तिथला सुरक्षारक्षक परप्रांतीय असल्याने त्याने प्रतिभाताईंना ओळखलेच नाही, पण त्याने दुसऱ्या गेटने जाण्याची विनंती केली. मला प्रतिभाताई गेटवर आल्याची माहिती समजताच मी तातडीने तिथे गेलो आणि त्यांना आत मध्ये येण्याची विनंती केली, असा खुलासा अनिल वाघ यांनी केला.
या सगळ्या स्टोरी मधला ट्विस्ट असा, की जे बारामती टेक्स्टाईल पार्क शरद पवारांनी आणले असे सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्या बारामतीच्या टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर परप्रांतीय सुरक्षारक्षक नेमला, ज्याने प्रतिभाताई पवारांना ओळखलेच नाही!! बारामतीत पवार कुटुंबीयांना न ओळखणारा परप्रांतीय वॉचमन आहे, हा या स्टोरीतला सगळ्यात वेगळा ट्विस्ट ठरला. एरवी पवारांना बारामतीतल्या घराघरातली माणसे माहिती आणि घराघरातल्या माणसांना सगळे पवार माहिती, पण टेक्स्टाईल पार्कच्या परप्रांतीय वॉचमनला खुद्द शरद पवारांच्या पत्नीच माहिती नाहीत. त्याने म्हणे प्रतिभाताईंना ओळखलेच नाही. आता पवारांच्या या लोक सांगती असणाऱ्या गाढ संपर्काला नेमके काय म्हणावे??
Baramati textile park pratibha pawar entry episode
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडा, मनोज जरांगे यांचे छगन भुजबळांच्या येवल्यात आवाहन
- Rajnath Singh संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- Rahul & priyanka Gandhi भावा – बहिणीच्या भाषणांची प्रादेशिक स्क्रिप्ट; ठाकरे + पवारांमागे काँग्रेसची फरफट!!
- Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई चकमकीत पाच जण ठार