संतप्त पारधी समाजाच्या लोकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले आहे.Baramati : Sit-in agitation in front of Ajit Pawar’s Sahyog Society residence; Police settlement
विशेष प्रतिनिधी
बारामती : सोनगावमध्ये बारामती पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्याविरोधात कारवाई केली.त्यावेळी दारू विक्रेता मंगलेश भोसले हा पळून गेला.पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता त्याने नीरा नदीत उडी मारली. पोहताना त्याला दम लागल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
त्यामुळे संतप्त पारधी समाजाच्या लोकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.यावेळी सोनगावमध्ये जे पोलीस कारवाईसाठी आले होते. त्यांच्या वर गुन्हा दाखल करावा, अशी समाजाच्या लोकांची मागणी केली.