• Download App
    Baramati Bypolls 2026: Congress Challenges MVA Stance; May Field Candidate Against Sunetra Pawar VIDEOS बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस लढणारच; महाविकास आघाडीत मतभेद, बिनविरोध निवडीची शक्यता धूसर

    Baramati Bypolls 2026 : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस लढणारच; महाविकास आघाडीत मतभेद, बिनविरोध निवडीची शक्यता धूसर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Baramati Bypolls 2026 अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे बारामती तर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीत २३ एप्रिलला विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्यात सुनेत्रा पवारांविरुद्ध मविआ उमेदवार देणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र, काँग्रेसने बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मविआतील मतभेद समोर आले आहेत.Baramati Bypolls 2026

    काँग्रेसचे नेते, आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, सुप्रिया सुळेंनी घेतलेल्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नाही. बारामती, राहुरीत शरद पवार गटाने निवडणूक लढवली नाही तर काँग्रेस त्या जागांवर उमेदवार देण्याचा विचार करेल. मविआत चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, असे निदर्शनास आणून दिले असता वडेट्टीवार म्हणाले की, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही लढणार आहोत.Baramati Bypolls 2026



    हे राजकीय डावपेच!

    विश्लेषकांनुसार, सुप्रिया सुळे व वडेट्टीवारांच्या वेगवेगळ्या भूमिका हा राजकीय डावपेचांचा भाग असू शकतो. सुनेत्रांनी शरद पवारांशी चर्चा न करता उपमुुख्यमंत्रिपद स्वीकारले. विलीनीकरणावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी पवार कुटुंबात नाराजी आहे. मात्र, बारामतीत सुनेत्रांविषयीची सहानुभूती लक्षात घेता त्यांना शरद पवार गट उघड विरोध करू शकत नाही म्हणून काँग्रेसला पुढे केले आहे.

    Baramati Bypolls 2026: Congress Challenges MVA Stance; May Field Candidate Against Sunetra Pawar VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Corporate : नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:मेमन, कुरेशीचा जामीन नाशिक कोर्टाने फेटाळला

    Dattatray Bharne : पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास पाच वर्षांची बंदी:31 जुलैपूर्वी पीक विमा उतरवा- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

    उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; २० पैकी किती राहणार हजर आणि किती राहणार गैरहजर??; आकड्याकडे लक्ष!!