• Download App
    Baramati Morcha संतोष देशमुख प्रकरणात अडकलेले सगळे नेते "पवार संस्कारित"; पण बारामतीतला निषेध मोर्चा युगेंद्र पवारांच्या हजेरीत!!

    संतोष देशमुख प्रकरणात अडकलेले सगळे नेते “पवार संस्कारित”; पण बारामतीतला निषेध मोर्चा युगेंद्र पवारांच्या हजेरीत!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडकलेले सगळे नेते “पवार संस्कारित”; पण बारामतीतला निषेध मोर्चा मात्र युगेंद्र पवारांच्या उपस्थितीत!!, असे आज घडले.

    संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा क्रांती ठोक मोर्चाने बारामती मध्ये मोर्चाचे आयोजन केले त्या आयोजनामध्ये योगेंद्र पवारांना बोलवले. या मोर्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रालयाला टार्गेट केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजितदादांचे राजीनामा दिलेले मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करायची मागणी केली. पण या सगळ्यामध्ये “पवार संस्कारित” नेते अडकून देखील कोणीही पवारांच्या संस्कारांवर चकार शब्दही उच्चारला नाही.

    बारामतीतल्या मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख सामील झाले. धनंजय देशमुख यांनी पण पवारांच्या कुठल्याही संस्कारांचा उल्लेख न फक्त फडणवीस सरकारलाच घेरले. हत्येचा सूत्रधार संतोष आंधळे पोलिसांच्या कृपेनेच गेले दोन वर्षे बीड परिसरात वावरत होता. पोलिसांचे त्याला संरक्षण होते, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला.

    संतोष देशमुख हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याला साथ दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी युगेंद्र पवार यांनी केली. विशेष म्हणजे युगेंद्र पवार आपल्या परिवारासह बारामतीतल्या मोर्चाला हजर राहिले. पण त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात चकार शब्द उच्चारला नाही. त्यांनी फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यातले कनेक्शन सांगून देवेंद्र फडणवीस यांच्या गृह मंत्रालयालाच फक्त टार्गेट केले.

    Baramati Morcha for Santosh Deshmukh murder case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    17 मुले आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर; त्याला कुणाशी, कशासंदर्भात बोलायचे होते??, प्रश्न अनुत्तरीत!!

    सत्याच्या मोर्चाची दुसरी बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये; राज आणि उद्धव हजर, पण पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र गैरहजर, बैठकीचे महत्त्व राहिलेच काय??

    Maharashtra SEC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच; कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण