नाशिक : Ajitdada बारामती बाराची, पराभवानंतरही अजितदादांची खुमखुमी!!, असा प्रकार समोर आला. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही पवार काका – पुतण्याचा दणकून पराभव झाला. भाजपशी टक्कर घेणे दोन्ही पवारांना एकत्र येऊन सुद्धा जमले नाही, भाजपवर नाही नाही ते आरोप करून अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांची सत्ता खेचून आणता आली नाही, तरीसुद्धा अजित पवारांची खुमखुमी शमली नाही, याचेच प्रत्यंतर आले.Baramati Barachi, Ajitdad’s Khumkhumi even after defeat!!
– शरद बुट्टे पुन्हा राष्ट्रवादीत
अजित पवार यांनी शरद बुट्टे पाटील यांना भाजपमधून राष्ट्रवादीत परत घेताना केलेल्या भाषणात बारामती बाराची असल्याची कबुली दिली. कुठल्या पंचायत समितीमध्ये किती सदस्य आहेत, याचे वर्णन करताना अजित पवारांनी बारामतीत पंचायत समितीच्या 12 सदस्यांचा उल्लेख केला, पण तो उल्लेख करताना धडपणे करणे ऐवजी तो अडवळणाने केला. पुणे जिल्ह्यात 73 जिल्हा परिषद सदस्य आहेत आपल्या 13 पंचायत समिती आहेत सगळ्यात मोठी पंचायत समिती खेड राजगुरुनगरची 16 ची आहे. तशीच जुन्नर, इंदापूरची सुद्धा सोळा चीच आहे, पण बारामती बाराची आहे म्हणजे 12 सदस्यांची आहे, असे अजित पवार म्हणाले. त्यावर उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला. त्यावेळी अजित पवारांनी या बाराचे खूप अर्थ निघतात, असे म्हणून आपल्या वक्तव्याचे समर्थन केले.Ajitdada
– नव्या वादाची खुमखुमी
पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीत अजितदादांनी भाजपच्या नेत्यांवर आरोप करताना पैलवानी शड्डू ठोकले. मी पण ऑलिंपिक संघटनेचा अध्यक्ष आहे. तिथल्या पैलवानाला दाखवतोच घुटना डावावर चीतच करतो. नाही त्याला चीत केले तर नावाचा पवार नाही. पवारांची औलाद सांगणार नाही, अशी दमबाजी त्यांनी आमदार महेश लांडगे यांना केली होती. प्रत्यक्षात महेश लांडगे यांनीच अजितदादांना आस्मान दाखविले. पण त्या निवडणुकांमध्ये वापरलेली आक्रस्ताळी भाषा अजितदादांच्या अंगलट आली, तरीसुद्धा त्यांची खुमखुमी गेली नाही. जिल्हा परिषद निवडणूक सुरू होतानाच बारामती बाराची असे सांगून त्यांनी नव्या वादाला सुरुवात केली. आपले राजकीय भरणपोषण करणाऱ्या बारामतीलाच बाराची ठरवून अजितदादांनी आपल्याच गावावर दुगाण्या झोडल्या.
Baramati Barachi, Ajitdad’s Khumkhumi even after defeat!!
महत्वाच्या बातम्या
- संस्कृत भारतीच्या १० संस्कृत पुस्तकांचे २२ जानेवारीला पुण्यात लोकार्पण
- कपिल सिब्बल जे बोलले, ते राजकीय सत्यच!!; पण…
- समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत
- Greenland : ग्रीनलँडमध्ये निदर्शने- ट्रम्प यांच्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले:, म्हटले- आमचा देश विक्रीसाठी नाही