• Download App
    बारामतीच्या दिवाळीचे कौतुक पुरे झाले, आता धनगर आरक्षणासाठी उद्या बारामती बंदची हाक!! Baramati band tomorrow for Dhangar reservation

    बारामतीच्या दिवाळीचे कौतुक पुरे झाले, आता धनगर आरक्षणासाठी उद्या बारामती बंदची हाक!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : बारामतीतल्या दिवाळीचे कौतुक पुरे झाले आता धनगर आरक्षणाकडे लक्ष द्या अशी परखड भूमिका घेत धनगर समाजाने उद्या 16 नोव्हेंबर 2023 रोजी बारामती बंदची हाक दिली आहे. Baramati band tomorrow for Dhangar reservation

    बारामतीत धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात व्हावा या मागणीसाठी 9 नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू आहे. धनगर समाजाचे चंद्रकांत वाघमोडे आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असतानाही या आंदोलनाकडे प्रशासकीय स्तरावर गांभीर्याने घेतले जात नसल्याची तक्रार धनगर समाजाने केली आहे.

    त्यामुळे धनगर आरक्षणाच्या मागणीकडे शासकीय स्तरावर दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी, 16 नोव्हेंबरला ‘बारामती बंद’ची हाक देण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदनाची प्रत पोलीस निरिक्षक व उपविभागीय पोलिस अधिका-यांना देण्यात आली आहे. हा बंद शांततेत पार पाडला जाईल, अशी ग्वाही या निवेदनात देण्यात आली आहे.

    बारामतीतल्या पवार कुटुंबाच्या दिवाळीत धनगर आरक्षण विषयाचा अडथळा येऊ नये म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषण स्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली होती. त्यावेळी आंदोलकांनी आक्रमक होत त्यांच्याच खासदारकीच्या राजीनामाची मागणी केली पण आपल्या राजीनामामुळे धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का??, असा उलटा सवाल करून सुप्रिया सुळे यांनी राजीनामा देणे नाकारले आणि मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना उपोषण स्थळावरूनच फोन लावला.

    पण धनगर आरक्षण आंदोलकांनी बारामतीत येणाऱ्या नेत्यांना अडवण्याचा इशारा दिल्यामुळे सुप्रिया सुळे आंदोलन स्थळी पोहोचल्या होत्या, ही वस्तुस्थिती लपून राहिली नाही. आता दिवाळी संपली आहे. बारामतीतल्या दिवाळीचे कौतुकही झाले आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षणाकडे लक्ष द्या, अशी परखड मागणी करत धनगर आरक्षण आंदोलकांनी उद्या बारामती बंद पुकारला आहे.

    Baramati band tomorrow for Dhangar reservation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस