• Download App
    BAPPI DA : चलते..चलते...मेरे ये गीत याद रखना ! संगीतकार, गायक बप्पी लहरी यांचं मुंबईत निधन, बॉलिवूडचा गोल्डमॅन काळाच्या पडद्याआड । BAPPI DA: Chalte..chalte ... remember these songs of mine! Musician, singer Bappi Lahari dies in Mumbai, Bollywood's Goldman behind the scenes

    BAPPI DA : चलते..चलते…मेरे ये गीत याद रखना ! संगीतकार, गायक बप्पी लहरी यांचं मुंबईत निधन, बॉलिवूडचा गोल्डमॅन काळाच्या पडद्याआड

    संगीतसह बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध म्युझिक कम्पोझर, सिंगर बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये बप्पी लहरी यांनी अखेरचा श्वास घेतला. BAPPI DA: Chalte..chalte … remember these songs of mine! Musician, singer Bappi Lahari dies in Mumbai, Bollywood’s Goldman behind the scenes


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं मुंबईत निधन झालं आहे. मुंबईतल्या रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. PTI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.

    बप्पी लहरी यांचे निधन ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे (Obstructive Sleep Apnea) झाले. बप्पी लहरी यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते. ते अनेक व्याधींनी देखील त्रस्त होते. त्यांच्या एका निकटवर्तीने सांगितले कि, जवळपास एक महिन्यांनंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतु मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने मुंबईतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना बप्पी लहरी यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती क्रिटिकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ.दीपक नामजोशी यांनी दिली आहे.

    संगीतकार बप्पी लहरी हे त्यांच्या संगीतासाठी आणि गाण्यांसाठी जेवढे प्रसिद्ध होते तेवढेच त्यांच्या गोल्डन अवतारासाठीही. खास प्रकाराचे सूट त्यावर सोन्याच्या चेन, काळा गॉगल हा त्यांचा लुक खास प्रसिद्ध होता. बॉलिवूडला डिस्को आणि पॉप संगीताची ओळख करून देणारा हा कलाकार आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.



    बप्पी लाहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 ला पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी मध्ये झाला होता. 2021 मध्ये त्यांना कोरोनाही झाला होता. मात्र कोरोनावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली. तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है.. तेरा प्यार ही आणि यासारखी अनेक सुपरहिट गाणी बप्पीदांनी गायली आहेत. बप्पी लाहिरी यांचं मूळ नाव आलोकेश लाहिरी असं होतं.

    १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगित देत त्यांनी करिअरची सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली. विशेष म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्या सोन्याचा दागिन्यांचीही चर्चा होऊ लागली.

    बप्पीदा सोन्याचे दागिने का घालत?

    तुम्ही एवढे सोन्याचे दागिने का घालता? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेस्ली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम सोन्याची चेन घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकंच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असं ठरवलं होतं. त्यातच मला असं वाटतं की सोनं माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोनं घालतो आणि त्यामुळेच गाण्यासोबत माझी वेगळी ओळखही झाली आहे, असं बप्पीदांनी सांगितलं होतं. आज बॉलिवूडचा हा सोनेरी आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

    BAPPI DA : Chalte..chalte … remember these songs of mine! Musician, singer Bappi Lahari dies in Mumbai, Bollywood’s Goldman behind the scenes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!