• Download App
    एकीकडे संभाजीनगरात मराठा समाजात भांडण; दुसरीकडे नाशकात छगन भुजबळांना गावबंदीचे बॅनर!! Banner of village ban to Chhagan Bhujbal in Nashik

    एकीकडे संभाजीनगरात मराठा समाजात भांडण; दुसरीकडे नाशकात छगन भुजबळांना गावबंदीचे बॅनर!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : एकीकडे छत्रपती संभाजी नगरात मराठा समाजात भांडण तर दुसरीकडे नाशकात छगन भुजबळ यांना गावबंदीचे बॅनर!!, असे चित्र आज दिसले. Banner of village ban to Chhagan Bhujbal in Nashik

    मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला लोकसभा निवडणुकीत जोरकस भूमिका घेण्याचे आवाहन केल्यानंतर मराठा समाजाच्या गावागावांमध्ये बैठक होत आहेत. यापैकी संभाजीनगर मधल्या बैठकीत मराठा समाजातले लोक एकमेकांना भिडले. विकी पाटील नावाच्या मराठा युवकाला या बैठकीत मारहाण झाली. त्याची बातमी सगळ्या महाराष्ट्रभर पसरली. मराठा समाजाने एकजूट दाखवून प्रत्येक जिल्ह्यात एकच उमेदवार उभा करावा आणि आपली ताकद दाखवावी, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले खरे, पण संभाजीनगर मात्र त्याचे वेगळेच पडसाद उमटले.

    स्वतः मनोज जरांगे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन मराठा समाज मोठा असल्याने भांड्याला भांडे लागते. ज्या दोन युवकांमध्ये वाद झाला त्यांना बोलवून घेऊन तो वाद मिटवू , असे सांगून जरांगे यांनी त्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

    एकीकडे संभाजीनगर मध्ये हे घडत असताना दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची शक्यता लक्षात घेऊन नाशिक तालुक्यामधल्या गावात त्यांच्यावर गाव बंदी लादण्याचे बोर्ड लावले गेले. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांचा जाहीर निषेध. ते जर नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार असतील तर त्यांना मतदान करू नये. त्यांचा प्रचारही करू नये. भुजबळांना ग्रामीण भागातून तीव्र विरोध आणि गाव बंदी आहे, असे या बोर्डवर लिहिले होते. पोलिसांनी तातडीने कारवाई करून हा बोर्ड काढून टाकला. पण नाशिक तालुक्यात अन्यत्र देखील असे बोर्ड लावू, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला. त्यामुळे एकीकडे संभाजी नगरात मराठा समाजात भांडण तर दुसरीकडे नाशकात छगन भुजबळांना गावबंदीचे बॅनर!!, अशी स्थिती दिसली.

    Banner of village ban to Chhagan Bhujbal in Nashik

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस