वृत्तसंस्था
पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर भरदिवसा दरोडा टाकण्यात आल्याने खळबळ उडाली. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड बँकेच्या शाखेवर हा दरोडा दुपारी दीड वाजण्याच्या टाकला आहे Bank robbery caught in CCTV in pune district of pune
दरोडेखोरांनी पिस्तुलीचा धाक दाखवून बँकेतून कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लंपास केली. ही घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत.
बँकेवर दरोडा टाकण्यात आल्यानंतर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलि स्टेशनला, सर्व पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल आणि नागरिकांना महत्वाचा संदेश पाठवला आहे. शिरूर हद्दीतील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेवर सशस्त्र दरोडा पडला असून दरोडेखोर २५ -३०वयोगटातील असल्याचं बोललं जात आहे.
५ -६ दरोडेखोरांनी निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, ग्रे रंगाचे जर्किन, कानटोपी चष्मा व पायात बूट हे सिल्वर रंगाच्या मारुती सियाज गाडी पुढील बाजूस प्रेस,असे लिहिलेले आहे. सदर गाडीतून आरोपी नगर दिशेला पळून गेले आहेत.
शिंगवे, पारगाव, रांजणी, वळती, भागडी, थोरांदळे आणि इतर गावातील पोलीस पाटील यांनी सदरचा मेसेज आपापले गावांमध्ये इतर ग्रुपमध्ये प्रसारित करा. तसेच या वर्णाची गाडी आणि संशयित मिळाल्यासतात्काळ मंचर स्टेशनला कळवावे. ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने सदरची गाडी व इसम पकडून ठेवावे, असा संदेश पाठवला आहे.
Bank robbery caught in CCTV in pune district of pune
महत्त्वाच्या बातम्या
- खुशखबर : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी केली गोड, महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ
- वर्दीतली आई ! लेकराला पोटाला बांधून DSP डूट्यीवर तैनात ! शिवराजसिंग म्हणाले-मध्यप्रदेशको आपपर गर्व है!
- जॅकलीन फर्नांडिसची ईडीकडून 7 तास चौकशी, तपास यंत्रणेचा दावा – सुकेशने अभिनेत्रीला महागडी कार केली होती गिफ्ट
- धनंजय मुंडे म्हणाले -“आम्हाला तिघांना ग्रहण लागलं होतं, अजित पवारांनी विश्वास ठेवला, नाहीतर हे आयुष्यभराचं ग्रहण असतं “