नवीन वर्षात जर तुम्हाला बँकेशी संबंधित काही काम असेल किंवा तुम्ही बँकेच्या शाखेत जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही त्यापूर्वी जानेवारी महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासा, जेणेकरून तुम्हाला नियोजन करता येईल. जानेवारी महिन्यात बँका 16 दिवस बंद राहणार आहेत. Bank Holidays Various banks across the country will be closed for 16 days in January, see full list of holidays here
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवीन वर्षात जर तुम्हाला बँकेशी संबंधित काही काम असेल किंवा तुम्ही बँकेच्या शाखेत जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही त्यापूर्वी जानेवारी महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासा, जेणेकरून तुम्हाला नियोजन करता येईल. जानेवारी महिन्यात बँका 16 दिवस बंद राहणार आहेत.
राज्याच्या सुट्ट्यांचाही समावेश
या यादीमध्ये राज्याच्या सुट्ट्यादेखील समाविष्ट आहेत, त्यामुळे तुमच्या शहराचे नाव पाहून बँकेत जाण्याचा प्लॅन करा. बँकिंग हॉलिडे कॅलेंडर रिझर्व्ह बँकेकडून प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला जारी केले जाते, जेणेकरून कर्मचारी आणि ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये.
आरबीआयने जारी केलेल्या यादीमध्ये सर्व राज्यांनुसार सुट्ट्या आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या राज्यातील सुट्ट्या तपासा, तुमच्या ठिकाणी कोणत्या दिवशी बँका बंद राहतील हे पाहा. या 16 सुट्ट्या सर्व राज्ये आणि सर्व शहरांना लागू होणार नाहीत.
बँक सुट्ट्यांची यादी – जानेवारी 2022
१ जानेवारी २०२२ – नवीन वर्षामुळे सुटी (आयझॉल, शिलाँग, चेन्नई आणि गंगटोक)
2 जानेवारी 2022 – रविवारमुळे बँका बंद राहतील
3 जानेवारी 2022 – सिक्कीममध्ये नवीन वर्ष आणि लासुंगची सुट्टी (आयझॉल आणि गंगटोक)
4 जानेवारी 2022 – सिक्कीम (गंगटोक) मध्ये लासुंग सणाची सुट्टी असेल.
8 जानेवारी 2022 – दुसरा शनिवार
9 जानेवारी 2022 – गुरु गोविंद सिंग जयंती आणि रविवारच्या निमित्ताने बँक बंद
11 जानेवारी 2022 – मिशनरी डे मिझोराम (आयझॉल)
12 जानेवारी 2022 – स्वामी विवेकानंद जयंती सुट्टी (कोलकाता)
14 जानेवारी 2022 – मकर संक्रांतीला अनेक राज्यांमध्ये सुट्टी असेल (अहमदाबाद आणि चेन्नई)
15 जानेवारी 2022 – आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, तामिळनाडूला पोंगलची सुट्टी असेल
16 जानेवारी 2022 – देशभरात साप्ताहिक सुट्टी
१८ जानेवारी २०२२ – थाईपुसम महोत्सव (चेन्नई)
22 जानेवारी 2022 – चौथा शनिवार
23 जानेवारी 2022 – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, देशभरात आठवडा सुट्टी
26 जानेवारी 2022 – देशभरात प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असेल
30 जानेवारी 2022 – रविवार
शनिवार आणि रविवारी बँका बंद राहतील
या सुट्ट्यांच्या यादीत शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. जानेवारी महिन्यात 2, 9, 16, 23 आणि 30 तारखेला रविवार असल्याने बँकांमध्ये काम होणार नाही. याशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँकांमध्ये कामकाज होणार नाही.