• Download App
    Bangladeshi पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या हॉटेलमध्ये चाललेला कुंटणखाना उद्ध्वस्त; बांगलादेशी महिलांना अटक; हॉटेल मालक फरार!!

    पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या हॉटेलमध्ये चाललेला कुंटणखाना उद्ध्वस्त; बांगलादेशी महिलांना अटक; हॉटेल मालक फरार!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या हॉटेलमध्ये चाललेला कुंटणखाना पोलिसांनी उध्वस्त केला यात दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली असून हॉटेल मालक मात्र फरार झाला. हा सगळा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातल्या देवळा शहरात घडला.

    देवळा शहरामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी सुनील आहेर उर्फ गोटू आबा याचे हॉटेल वेलकम आहे. त्या हॉटेलमध्ये गेले कित्येक दिवस कुंटणखाना चालू होता. पोलिसांना या संदर्भात माहिती मिळतच त्यांनी हॉटेलवर छापा घालून तिथला सगळा प्रकार तपासला त्यावेळी त्यांना धक्कादायक माहिती मिळावी. तिथे बांगलादेशी महिलांना कुंटणखाना चालवला जात होता. पोलिसांनी तिथे दोन बांगलादेशी महिलांना अटक केली. त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे तपासणी असताना ती मुंबई आणि पुण्यातली आढळून आली.

    काही वर्षांपूर्वी अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याचेही पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी हॉटेल वेलकमचा मालक सुनील आहेर उर्फ गोपू आबा याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो फरार झाला. पोलिसांनी हॉटेलच्या व्यवस्थापक दीपक ठाकरे याला ताब्यात घेतले. टीव्ही ९ मराठीने ही बातमी दिली.

    कुंटणखाना प्रकरणात अटक केलेल्या बांगलादेशी महिलांना आणि दीपक ठाकरे ला पोलिसांनी कळवण न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. देवळातल्या हॉटेल वेलकम मध्ये कुंटणखाना बरेच महिने चालू होता. त्याचे मालेगावचे देखील कनेक्शन होते या संदर्भात पोलिस आता सखोल तपास करत असून तिथून मोठ्या बांगलादेशी रॅकेटचा तपास लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

    Bangladeshi women arrested; hotel owner absconding!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : इतिहासकारांचा आपल्या नायकांवर, मराठा साम्राज्याच्या इतिहासावर अन्याय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    ठाकरे बंधूंच्या ऐक्य मेळाव्याच्या दिवशी पवारांचे वेगळेच नियोजित कार्यक्रम, मेळाव्याला राहणार गैरहजर!!

    पेशवे 100 वर्ष लढले त्यामुळे भारताचे मूळ स्वरूप टिकून राहिले; श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाबद्दल अमित शाहांचे गौरव उद्गार