गर्दीचा फायदा घेउन बससह स्थानकामध्ये मोबाइल चोरी करणाऱ्या दोघा सराइतांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आणून ४६ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
विशेष प्रतिनिधी
पुणे – गर्दीचा फायदा घेउन बससह स्थानकामध्ये मोबाइल चोरी करणाऱ्या दोघा सराइतांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आणून ४६ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर पोलीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.Bangarden police Arrested mobile theft accused and recovered ४६ mobiles
सद्दाम कासीम शेख (वय २३ रा. कोंढवा) आणि अनिल ऊर्फ आन्या अरुण बोबडे (वय २७ रा. कँप) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार राठोड (रा. कात्रज) हे कुटूंबियासह १६ एप्रिलला सकाळी सातच्या सुमारास पायी चालले होते. त्यावेळी दोघा चोरट्यांनी त्यांचा मोबाइल हिसकावून नेला.
याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढला असता ते सराईत सद्दाम आणि अनिल असल्याचे निष्पन्न झाले. दोघेही चोरटे पुणे स्टेशन परिसरात आले असता पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून १० लाखांवर ४६ मोबाइल जप्त करण्यात आले.
Bangarden police Arrested mobile theft accused and recovered ४६ mobiles
महत्त्वाच्या बातम्या
- पत्नीच्या वैद्यकीय उपचारासठी दुग्ध व्यवसायाकाला रस्त्यात गाठून कोयत्याने वार
- SBI : राजस्थानात बँकेच्या तिजोरीतून तब्बल 11 कोटींची नाणी गायब; सीबीआय चौकशी सुरू!!
- ८००० मेगा वॅट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन तातडीच्या उपाययोजना करा उद्धव ठाकरे यांचे उर्जा विभागाला निर्देश
- ट्रॅप मध्ये अडकलेल्या व्यवसायिकाची ४४ लाखांची फसवणुक