केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती; जाणून घ्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल
प्रतिनिधी
महाराष्ट्रातील एका महामार्गावर २०० मीटर लांब बांबू क्रॅश बॅरियर बसवण्यात आला आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. गडकरींनी याला जगातील पहिला असा अनोखा प्रयोग म्हटले आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणाऱ्या एका महामार्गावर हा बांबू क्रॅश बॅरियर बसवण्यात आला आहे. India World first 200 meter long Bamboo Crash Barrier installed on Maharashtra highway
आज(शनिवार) केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी देश आणि बांबू निर्मिती क्षेत्रासाठी ही मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले. तसेच, हा क्रॅश बॅरियर स्टीलसाठी एक योग्य पर्याय देतो आणि पर्यावरणाशी निगडीत चिंता दूर करतो असे म्हटले आहे.
नितीन गडकरी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, जगातील पहिल्या २०० मीटर लांब बांबू क्रॅश बॅरियरच्या निर्मितीबरोबरच आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ही एक असाधारण उपलब्धी आहे. वणी-वरोरा महामार्गावर हा बांबू क्रॅश बॅरियर बसवण्यात आला आहे. याशिवाय, या बांबू क्रॅश बॅरियरला बाहूबली नाव देण्यात आलं आहे.
याशिवाय क्रॅश बॅरियर महामार्गाच्या बाजूला लावले जातात आणि एखादे वेगवान वाहन अनियंत्रित झाले तर ते रस्त्याच्या खाली जाण्यापासून रोखले जाते. शिवाय यामुळे वाहनाचा वेगी कम होतो. असेही गडकरी म्हणाले.
याचबरोबर अन्य एका ट्वीटमध्ये नितीन गडकरी यांनी सांगितले की, इंदुरच्या पीतमपुर येथे नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्स सारख्या विविध सरकारी संस्थांनी यांचे कडक परीक्षण केले आहे आणि रूरकी येथे केंद्रीय भवन अनुसंधान संस्था(सीबीआरआय) मध्ये आयोजित फायर रेटिंग दरम्यान यास अ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त इंडियन रोड काँग्रेसद्वारेही मान्यता देण्यात आली आहे. गडकरींनी म्हटले की बांबू बॅरियरची रिसायकल व्हॅल्यू ५०-७० टक्के हे, तर स्टील बॅरियरची ३०-५० टक्के आहे.
India World first 200 meter long Bamboo Crash Barrier installed on Maharashtra highway
महत्वाच्या बातम्या
- मेघालयात सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी रस्सीखेच! भाजपाच्या संगमांना कोंडीत पकडण्याचा तृणमूल काँग्रेसचा डाव!
- ‘’जर असेल मर्दांची पार्टी तर एकास एक भिडायला या” आशिष शेलारांचं विरोधकांना खुलं आव्हान!
- उद्धव ठाकरेंकडून लता मंगेशकर संगीत विद्यालयाची परवानगी रद्द??; आशिष शेलारांचा खळबळजनक दावा
- ‘’संजय राऊत हे वैफल्यग्रस्त, निराश व मानसिक तणावाखाली असल्याने ते…’’ आशिष शेलारांचे टीकास्त्र!