• Download App
    Anjangaon Statue Case: Mastermind Balraje Aware’s Factory in Jalna Sealed अंजनगाव पुतळा प्रकरण; बाळराजे आवारेचा जालन्यातील पुतळा बनवण्याचा कारखाना पोलिसांनी केला सील

    Anjangaon Statue Case : अंजनगाव पुतळा प्रकरण; बाळराजे आवारेचा जालन्यातील पुतळा बनवण्याचा कारखाना पोलिसांनी केला सील

    Anjangaon Statue Case

    विशेष प्रतिनिधी

    जालना : Anjangaon Statue Case  सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथील वादग्रस्त पुतळा प्रकरणात पोलिसांनी तपासाचा फास अधिक आवळला आहे. पुतळा पुरवणारा मुख्य सूत्रधार बाळराजे ऊर्फ बाळू आवारे याच्या जालन्यातील कारखान्यावर प्रशासनाने टाळे ठोकले असून, त्याच्या एका जवळच्या साथीदारालाही सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अनधिकृत पुतळे तयार करणाऱ्या आणि बसवणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत.Anjangaon Statue Case

    माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे धनगर समाजाच्या देवस्थान परिसरात बाळू आवारेने कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय रात्रीतून पुतळा बसवला होता. या घटनेमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊन त्याचे रूपांतर दगडफेक आणि दंगलीत झाले होते. या प्रकरणात दोन्ही गटांतील अनेकांवर आणि मुख्य सूत्रधारावर आतापर्यंत आठ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.Anjangaon Statue Case



    कृषी केंद्राच्या नावाखाली पुतळा निर्मितीचा बनाव

    जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथे बाळू आवारेचा हा कारखाना सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, शासकीय गायरान जमिनीवर ‘कृषी अवजारे सेवा केंद्र’ असल्याचे भासवून एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे पुतळ्यांची निर्मिती केली जात होती. अंबडच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलिसांनी या कारखान्यावर धाड टाकून तो सील केला आहे.

    सहकाऱ्याला सीमेवरून अटक

    बाळू आवारेला तीन दिवसांपूर्वीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर आता त्याचा सहकारी संभाजी आघाव याला सोलापूर-धाराशिव सीमेवरून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.

    गंभीर गुन्ह्यांची नोंद

    बाळू आवारेवर केवळ माढाच नव्हे, तर करमाळा तालुक्यातील पुनावर येथेही अशाच प्रकारे विनापरवाना पुतळा बसवल्याचा आरोप आहे. त्याच्यावर जातीय तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर भाषणे देणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे यांसारखे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

    Anjangaon Statue Case: Mastermind Balraje Aware’s Factory in Jalna Sealed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ashok Kharat : भोंदू अशोक खरातविरुद्ध आणखी 11 महिलांकडून शोषणाची तक्रार; पोलिस आवाहनास प्रतिसाद

    Mahesh Sawant : आमदार महेश सावंत यांना हायकोर्टाचा दिलासा; आमदारकी राहणार कायम, सदा सरवणकरांची याचिका फेटाळली

    Amol Mitkari : पार्थदादा खरे तेच बोललेत, काँग्रेसचा डाऊनफॉलच सुरू, मिटकरींकडून समर्थन