प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गॅंगकडून जमीन खरेदी केल्याच्या आरोपाखाली बुधवारी ईडीने अटक करून कोठडीत ठेवले आहे. आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिकांना अटक केली. या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकार मलिकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर आले आहे. शिवसेनेनेही मलिकांची लांबून पाठराखण केली आहे. मात्र या मुद्द्यावरून आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला घेरले आहे.Balasaheb’s sons are rescuing the accused
ठाकरे यांचे पाळलेले दोन कुत्रे, दिवसभर भुंकत असतात; नितेश राणे यांचा टोला राऊतांना टोला
नितेश राणे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 1993 च्या दंगली नंतर मुंबई माननीय बाळासाहेबांनी वाचवली. आज त्यांचेच चिरंजीव मुख्यमंत्री असताना, 1993 च्या दंगलीतील आरोपींना वाचवत आहेत. म्हणून आता भगव्याची जबाबदारी आमची असे ट्विट राणेंनी केले आहे.
महा विकास आघाडीचे दोन घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी जरी नवाब मलिक यांच्या संवर्धनासाठी रस्त्यावर उतरले असले तरी शिवसेना मात्र या मुद्द्यावर रस्त्यावर आलेली नाही उलट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे उत्तर प्रदेशात शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी निघून गेले आहेत.
Balasaheb’s sons are rescuing the accused
महत्त्वाच्या बातम्या
- युक्रेनला गेलेले एअर इंडियाचे AI1947 विमान अर्ध्या वाटेवरूनच दिल्लीला माघारी, नागरिकांना सुखरूप आणण्यासाठी गेले होते
- Russia – Ukraine War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले- मृत्यू आणि विनाशाला केवळ रशियाच जबाबदार असेल, चोख प्रत्युत्तराचा इशारा
- रशिया-युक्रेनमधील युद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम, शेअर बाजार कोसळले, सोने महागले – चांदी 66,000 पार