प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना कुणाची यावरून जोरदार दावे प्रतिदावे केले जात असले तरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना मोठा झटका शिंदे गटाने दिला आहे. उध्दव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून जयदेव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात हजेरी लावून आपले मनोगतही व्यक्त केले. इतकेच नाही, तर बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे हे शिंदे यांच्या शेजारी व्यासपीठावर बसले होते.
Balasaheb’s son Jaydev Thackeray with Eknath Shinde; Natu Nihar Thackeray is next to Shinde on the stage
मूळ शिवसेना कुणाची यावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरु असताना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातच जयदेव ठाकरे यांना व्यासपीठावर निमंत्रित करून शिंदे यांनी उध्दव ठाकरेंना मोठा झटका दिला. यावेळी जयदेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी हे सर्व बरखास्त करा आणि शिंदे राज्य येऊ द्या, असेच सांगितले.
बिल्किस बानूच्या विषय काढून दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे पवारांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब!!
मागील अनेक वर्षांपासून जयदेव ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यामध्ये संपत्तीचे वाद असून हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. यावरील वाद सुरु असतानाच जयदेव ठाकरे यांनी मूळ शिवसेनेवर दावा करणाऱ्या शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिंदे गटाच्या या मेळाव्यात ठाकरे कुटुंबातील स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे यांनीही हजेरी लावली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरेंचीच असे म्हणणाऱ्या उध्दव ठाकरे यांनाही आता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आपल्याकडे घेऊन शिंदे यांनी सणसणीत चपराक दिल्याचे पहायला मिळत आहे.
Balasaheb’s son Jaydev Thackeray with Eknath Shinde; Natu Nihar Thackeray is next to Shinde on the stage
महत्वाच्या बातम्या
- संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात प्रथमच एव्हरेस्ट वीरांगना संतोष यादव यांच्या रूपाने प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या सहभागी!!
- शिवसेना विरुद्ध शिवसेना : आज मुंबईत पहिले शक्तीप्रदर्शन, ठाकरे आणि शिंदे गटाचा वेगळा दसरा मेळावा
- दोन्हीकडून बाळासाहेब ब्रँडच मोठा होणार असेल, तर महाराष्ट्रातल्या इतर ब्रँडचे होणार काय??
- दसरा मेळावे : गर्दी खेचण्याच्या स्पर्धेत कोणाला यशस्वी?, ठाकरे की शिंदे?; पोलिसांनी केला सर्व्हे!