प्रतिनिधी
ठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहाय्यक चंपा सिंह थापा यांच्या शिवसेना प्रवेशाने मातोश्री सोडून शिवसेना प्रवेशाने शिंदे गटाला “मोराल बूस्टर डोस” मिळाला आहे. आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून शिवसेनेचे आमदार नगरसेवक शिवसैनिक आदी शिंदे गटाला येऊन मिळत होते, पण आता थेट बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केलेले दोन सेवक चंपा सिंह थापा आणि मोरेश्वर राजे यांनी उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी शिंदे गटाला पसंत केल्याने या दोन्ही कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला एक भावनिक झळाळी मिळाली आहे. Balasaheb’s confidants Champasingh Thapa, Moreshwar Raje joined the Shinde group
Eknath Shinde : अग बाई अरेच्या!!; “मनातले मुख्यमंत्री” की मनातले मांडे??
केवळ राजकीय दृष्टीनेच विचार करून आमदार, खासदार, नगरसेवक हे पक्ष निवडतात आणि पक्षांतर करतात पण दस्तूर खुद्द बाळासाहेबांची सेवा करण्याचा संधी ज्यांना मिळाली आहे, ते चंपा सिंह थापा आणि मोरेश्वर राजे हे दोन सेवक शिंदे गटाला येऊन मिळाल्याने राजकीय लाभापेक्षा भावनिक लाभ शिंदे गटाला अधिक झाल्याचे दिसते आहे या दोघांनी आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या टेंभी नाका नवरात्र उत्सवाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे मुख्यमंत्र्यांनी दोघांचेही आपल्या गटात स्वागत केले आहे.
चंपा सिंह थापा हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरपर्यंत बरोबर होते. अनेक दौऱ्यांमध्ये ते बाळासाहेब यांच्याबरोबर असतात. बाळासाहेबांची सर्व वैयक्तिक कामे ते करत. बाळासाहेबांच्या जेवणा खाण्याच्या वेळा, औषधाच्या वेळा ते संभाळत असत. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताईंचे निधन झाल्यानंतर बाळासाहेबांना भावनिक दृष्ट्या चंपा सिंह थापा यांनी नेहमीच साथ दिली. मोरेश्वर राजे यांनी देखील त्यांची अखंड सेवा केली.
Balasaheb’s confidants Champasingh Thapa, Moreshwar Raje joined the Shinde group
महत्वाच्या बातम्या
- राजस्थान काँग्रेस मधील पेचप्रसंगात गहलोत गट – काँग्रेस पक्ष निरीक्षकांच्या परस्पर विसंगत वक्तव्यांनी भर
- अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम स्वत:हून पाडा; सुप्रीम कोर्टाचे नारायण राणेंना आदेश
- नवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात महिला आरोग्य विशेष अभियान; ग्रामीण भागात विशेष भर
- राजस्थानात काँग्रेस नेतृत्वाची लढाई रस्त्यावर; रस्त्यावरच्या पोस्टर्सवर