प्रतिनिधी
मुंबई : बाळासाहेबांच्या मनातली आंदोलन मनसेने यशस्वी केली आहेत. अजूनही काही ठिकाणी “त्यांची” चरबी गेलेली दिसत नाही. जिथे त्यांचे भोंगे उतरले नाहीत, तिथे ट्रकमधून भोंगे नेऊन भोंग्यांवर हनुमान चालीसा लावा, असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसैनिकांना दिले आहेत. Balasaheb’s agitation was successfully carried out by MNS
राज ठाकरे यांनी आज सायंकाळी गोरेगावमधील नेस्को सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचे कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले, असे शरसंधान राज ठाकरेंनी साधले.
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. वातावरणात निवडणुका दिसत नाहीत. राज्यात सध्या सर्व बाजूने खोळंबा झाला आहे. या गटाला मान्यता मिळणार की नाही मिळणार यांना चिन्ह मिळणार की नाही मिळणार. त्यांना त्यांची डोकी खाजवू द्या आपण आपले काम करू.
- मनसेच्या आंदोलनाला सर्वाधिक यश मिळते. इतर पक्षांपेक्षा मनसेच्या आंदोलनाला यश मिळाले. लोकांच्या विस्मरणात ही आंदोलनात कशी जातील यासाठी काही यंत्रणा काम करतात.
- टोलनाक्याच्या आंदोलनानंतर 65 ते 67 टोलनाके बंद झाले. आंदोलन यशस्वी झाले. ज्यांनी निवडणुकांच्या तोंडावर टोल बंद करण्याची केवळ घोषणा केली त्यांना प्रश्न विचारले जात नाहीत, आम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यांना उत्तर देण्यासाठी मनसेच्या आंदोलनांची पुस्तिका काढणार आहे.
- कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही.
- स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली.
- आता म्हणतात राज ठाकरे हिंदुत्ववादी झाले. अहो मी हिंदुत्ववादी होतो आणि कट्टर मराठी कुटुंबात माझा जन्म झाला. पाकिस्तानी कलाकार जेव्हा धुडगूस घालत होते तेव्हा कुठे गेले होते हिंदुत्ववादी?
- बाळासाहेब जी भूमिका बोलत होते भोंगे उतरले पाहिजेत ती इच्छा आपण मनसेने पूर्ण केली. आपण भोंगे काढा असे नाही म्हणालो, नाही काढले, तर हनुमान चालीसा लावू असे सांगितले. पण अजून काही ठिकाणी चरबी जिरलेली नाही. जिथे त्यांचे भोंगे सुरू असतील तर पोलिसांना तक्रार दाखल करा. तरी भोंगे उतरले नाहीत, तर मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर लावून हनुमान चालीसा लावा.
- महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. नरेंद्र मोदी यांनी पहिली पाच वर्षे उत्तर प्रदेश बिहार आणि उत्तराखंडकडे लक्ष द्यावे. त्या राज्यांमधील लोक घरदार सोडून दुसऱ्या राज्यात जातात, त्यावेळी दुसऱ्या राज्यांना त्याचा त्रास होते. आज दोन प्रकल्प जातात याचे वाईट एका गोष्टीचे वाटते. कुठल्याही राज्यात प्रोजेक्ट केले त्याचे वाईट नाही वाटते. सर्व राज्यांची प्रगती झाली तर देश प्रगत होतो. नरेंद्र मोदी तुम्ही फक्त गुजरात गुजरात करू नका, प्रत्येक राज्य तुमचे अपत्य आहे, त्या प्रत्येक राज्याकडे समान पद्धतीने पाहणे गरजेचं आहे. ही आपली धारणा होती, आहे आणि राहील.
Balasaheb’s agitation was successfully carried out by MNS
महत्वाच्या बातम्या
- 40 रेडे पाडणार, मातोश्री वरचे खोके जाहीर करणार… पण इज्जत कुणाची जाणार??; आनंद कोणाला होणार??
- भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा आवश्यक, अन्यथा देशाच्या ऐक्याला धोका; केंद्रीय मंत्री गिरीराज सिंहांचा सूचक इशारा
- 2030 पर्यंत चंद्रावर मानवाची वस्ती; नासाच्या ओरियन स्पेसक्राफ्ट प्रकल्प प्रमुखांचा दावा
- बुद्धिवादी राष्ट्रवादी नेता हीच सावरकरांची खरी ओळख; दिल्लीच्या ‘प्रेस कॉन्फरन्स’मध्ये रणजित सावरकरांचे रॅपिड फायर
- ITBP Recruitment : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये नोकरीची संधी, करा अर्ज
- Imam Remuneration : मशिदींच्या इमामांना करदात्यांच्या पैशातून वेतन हे संविधानाचे हनन; केंद्रीय माहिती आयुक्तांचा निर्णय