विशेष प्रतिनिधी
मुंबई : झेपेनात नाना, तर थोरातांशी बोला, असे म्हणत काँग्रेसने उद्धव ठाकरेंचा हट्ट पुरविला पण थोरात पहिल्यांदा पवारांशी बोलले.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेनेने ताणून धरल्यानंतर काँग्रेसने देखील विदर्भातल्या जागा सोडायला नकार दिला त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात खडाजंगी झाली. जागावाटपाच्या चर्चेत नाना पटोले नकोत, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. शेवटी काँग्रेस हायकमांडने शिवसेनेची ही भूमिका मान्य केली आणि बाळासाहेब थोरात यांना चर्चेसाठी पुढे केले, पण बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरेंकडे मातोश्रीवर जाण्याआधी शरद पवारांशी बोलायला गेले.
शिवसेनेने आपला बालेकिल्ला मुंबई नवी मुंबई ठाणे आणि कोकण हा पट्टा सोडून काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विदर्भात हल्लाबोल केला काँग्रेसने 8 जागा देऊ केल्या असताना शिवसेनेने 12 जागा मागितल्या. यातून काँग्रेसचे संख्याबळ घटविण्याचा शिवसेनेने “डाव” आखला. तो “डाव” नानांनी ओळखला म्हणून नानांनी शिवसेनेला जागावाटपाच्या चर्चेत प्रखर विरोध केला. म्हणून मग शिवसेनेने जागा वाटपाच्या चर्चेत नानाच नकोत अशी भूमिका घेतली ही भूमिका सुरुवातीला काँग्रेस हायकमांडने मान्य केली. नाना पटोले यांच्या ऐवजी बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसकडून चर्चेसाठी मूक्रर केले. पण बाळासाहेब थोरात आज पहिल्यांदा शरद पवारांना भेटायला सिल्वर ओक वर गेले.
पवारांशी बोलून आल्यानंतर थोरातांनी महाविकास आघाडीत कोणताही तिढा नसल्याचा दावा केला. त्यानंतर थोरात उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत.
Balasaheb Thorat meets Sharad Pawar ahead of MVA seat-sharing meeting
महत्वाच्या बातम्या
- yashomati Thakur : मुख्यमंत्रीपदासाठीच काँग्रेसने शिवसेनेला धरले ताणून; पण काँग्रेसच्या विदर्भातल्या महिला नेत्याने दिला उद्धव ठाकरेंनाच
- Modi governments : ‘आरोग्य विमा’धारकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा
- Delhi Police : रोहिणी बॉम्बस्फोट प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई!
- Elon Musk : एलन मस्क म्हणाले- EVM मुळे निवडणुकीत हेराफेरी होते, बॅलेट पेपरद्वारे मतदानाचा दिला सल्ला