• Download App
    Balasaheb Thorat बाळासाहेब थोरात म्हणाले- सत्यजित तांबेंचे बोलणे

    Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणाले- सत्यजित तांबेंचे बोलणे बालिशपणाचे, काय बोलावे आणि काय नाही हे शिकले पाहिजे

    Balasaheb Thorat

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Balasaheb Thorat विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना राहुल गांधी यांच्या भेटीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने मला राहुल गांधींची अपाँइटमेंट घेऊन एक तासात त्यांना भेटून दाखवावे, असे एकप्रकारे आव्हानच त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना केले होते. आता यावर प्रतिक्रिया देताना सत्यजित तांबे यांचे मामा आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांना ‘बालिश’ म्हटले आहे. तसेच त्यांनी विचार करून बोलावे, असा सल्लाही बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे यांना दिला.Balasaheb Thorat

    बाळासाहेब थोरात यांनी आज मुंबई पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात तसेच विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी पत्रकारांनी बाळासाहेब थोरात यांना सत्यजित तांबे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, त्यांनी आक्रमक शब्दांत फटकारले. बाळासाहेब थोरात म्हणाले, सत्यजित तांबे बोलले हे खरे आहे. एकतर आपल्या जीवनात ज्यांनी आपल्यासाठी काही केले आहे ते ऋण कायम लक्षात ठेवले पाहिजेत. काँग्रेसने सत्यजितसाठी खूप काही केले आहे. पण त्यांचे बोलणे अजूनही बालिशपणाचे आहे. त्यांनी जरा विचार करून बोलावं. ते आता स्वतंत्र आहेत, पण काय बोलावे आणि काय नाही हे शिकले पाहिजे, असा घणाघात बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे यांच्यावर केला.



    अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

    बाळासाहेब थोरात यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवरही भाष्य केले. यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला, फळबागांसह इतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आलेला आहे. अनेक ठिकाणी घरांचे आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. पावसामुळे चाऱ्याचे नुकसान झाल्याने पशुधनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सरकार पंचनामे कधी आणि किती करणार? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी सरकारला केला आहे. मुदतीच्या घोषणा आणि बातम्या तुम्ही तशा देतात, परंतु, वास्तविक बांधावर प्रशासनावर फिरतंय असे अद्याप दिसलेले नाही, अशी टीकाही थोरात यांनी केली.

    सरसकट हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी

    शेतकऱ्यांचे मान्सूनपूर्वीच कंबरडे मोडले आहे. त्यामुळे खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना काही मदत द्यावी लागणार आहे. त्यांना तुटपुंजी मदत देऊन काही होणार नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत सरकारने द्यावी, असा आग्रह प्रदेश काँग्रेसने धरला असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. नेमके नुकसान काय झाले? हे पाहून त्या पद्धतीने नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणीही बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली आहे.

    Balasaheb Thorat Criticizes Satyajit Tambe

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Avinash Jadhav : संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागात घोटाळा; मनसेच्या अविनाश जाधवांचा आरोप

    ‘‘पीएमपीएमएल’’ कर्मचाऱ्यांसाठी ‘‘गुड न्यूज’’; सातव्या वेतन आयोगातील थकीत रक्कम मिळणार लवकरच!!

    गोपीनाथ मुंडेंचा मतदारसंघ रेणापूरच्या पंचायत समितीत भाजपच्या मदतीने मनसेच्या सभापती!!