विशेष प्रतिनिधी
सोलापूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भव्य रांगोळी रेखाटली असून या माध्यमातून त्यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले आहे.१६ बाय १८ फूट रांगोळीतून बाळासाहेब ठाकरे रेखाटले आहेत. त्याद्वारे त्यांना मानवंदना देण्यात आली.Balasaheb Thackerays magnificent rangoli drawn
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना शहर कार्यालय आणि विद्यार्थी सेनेच्या वतीने ही भव्य रांगोळी साकारली. रांगोळी काढण्यासाठी ६ रंग वापरले असून ४० तासांचा कालावधी लागला आहे.
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची रेखाटली भव्य रांगोळी; सोलापुरातील कलाकारांचा स्मृतिदिनी उपक्रम
यासाठी २७ किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. सोलापुरातील चित्रकार सिद्धाराम नालवार, प्रेम आडकी आणि सायली घंटे या तिघांनी मिळून ही कलाकृती साकारली आहे.
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची रेखाटली भव्य रांगोळी
- सोलापुरातील तीन कलाकारांचा अभिनव उपक्रम
- १६ बाय १८ फूट रांगोळीतून बाळासाहेब ठाकरे साकारले
- विद्यार्थी सेनेच्या वतीने ही भव्य रांगोळी
- ६ रंग वापरले असून ४० तासांचा कालावधी लागला
- तब्बल २७ किलो रांगोळीचा वापर