प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर आज, बुधवारी ठाकरे आणि शिंदे गटाच्या मेळाव्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरें आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्या दसरा मेळाव्याला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक दाखल होत आहेत. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे गटाचा मेळावा होत आहे. Balasaheb Thackeray’s chair on the platform in the second gathering of the Shinde group
एकनाथ शिंदेंचा मेळावा ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत. यातील खास बाब म्हणजे व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची खुर्ची राखील ठेवण्यात आली आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदेंनी हे बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार असल्याचे सांगितले होते.
तर आज मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची खुर्ची राखीव ठेवत आम्हीच बाळासाहेबांचे शिवसैनिक अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम आपल्या भाषणात हे बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि दिघे साहेबांच्या शिकवणीनुसार चालणारे सरकार असल्याचे उल्लेख करतात. खरी शिवसेना आमचीच असल्याचे दाखवण्यासाठी शिंदे गटाने भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.
तर दुसरीकडे शिवतीर्थावरील शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांची खुर्ची ठेवण्यात आली आहे. संजय राऊत यांना जामीन मिळाला नसल्याने राऊत तुरूंगातच आहेत. असे असले तरी शिवसेना राऊत यांच्या पाठिशी ठाम असल्याचा संदेश देण्यात आला आहे. दरम्यान, संजय राऊत आमचे नेते आहेत, त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी आम्ही ही खुर्ची रिकामी ठेवली असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Balasaheb Thackeray’s chair on the platform in the second gathering of the Shinde group
महत्वाच्या बातम्या
- संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात प्रथमच एव्हरेस्ट वीरांगना संतोष यादव यांच्या रूपाने प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या सहभागी!!
- शिवसेना विरुद्ध शिवसेना : आज मुंबईत पहिले शक्तीप्रदर्शन, ठाकरे आणि शिंदे गटाचा वेगळा दसरा मेळावा
- दोन्हीकडून बाळासाहेब ब्रँडच मोठा होणार असेल, तर महाराष्ट्रातल्या इतर ब्रँडचे होणार काय??
- दसरा मेळावे : गर्दी खेचण्याच्या स्पर्धेत कोणाला यशस्वी?, ठाकरे की शिंदे?; पोलिसांनी केला सर्व्हे!